Sharad Pawar – Chandrakant Patil : भव्य हिमालय तुमचा आमुचा ज्याची त्याची “बारामती”…!!


भव्य हिमालय तुमचा आमुचा
ज्याची त्याची “बारामती”
कोल्हापुरात चंदू पडता
काकाभक्तां ये उकळी…!!”

कविवर्य वसंत बापट यांच्या “भव्य हिमालय तुमचा आमुचा” या काव्यावर आधारित वरील ओळी सुचल्या आहेत. त्याचे कारणही तसेच घडत आहे… कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने 76000 पेक्षा जास्त मते घेतली असली तरी पराभव झाला आहे. आणि त्या पराभवामुळेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्याच घोषणेप्रमाणे हिमालयात निघून जावे, असाSharad Pawar – Chandrakant Patil: The magnificent Himalayas are yours, its “Baramati”

“आग्रह” जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. काही कार्यकर्त्यांनी तर रेल्वेचे थर्ड एसीचे बुकिंग देखील चंद्रकांत दादांच्या नावाने करून ठेवले आहे. चंद्रकांत दादांना हिमालयात पाठवण्याची वेगवेगळी मीम्स राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवून घेतली आहेत.



पण काही झाले तरी सरतेशेवटी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच ते… म्हणजे काकाभक्त…!! त्यांना तरी वेगळे दुसरे काय सुचणार…?? कारण भव्य हिमालय जरी तुमचा-आमुचा असला तरी ज्याची त्याची “बारामती” वेगळीच आहे ना…!! त्या “मती”तूनच काकाभक्तांनी चंद्रकांत दादांना “भव्य हिमालयात” पाठवून देण्याची तयारी चालवली आहे…!!

पण ही तयारी चालवताना काकाभक्त काकांनी स्वतःच 1980 च्या दशकात पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत केलेली घोषणा विसरले आहेत. “अंगाला राख फासून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही,” अशी घोषणा काकांनी करून ठेवली होती…!!

पण वर्षभरातच अंगाला राख फासण्याचे सोडाच काका आपल्या घोषणेलाच राख पासून राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये निघून गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. आता महाराष्ट्रातल्या बिचाऱ्या जनतेला काय माहिती ही काकांचा “हिमालय” महाराष्ट्रातून निघून 10 जनपथ मध्ये जाऊन विसावतो ते…!! त्या पलिकडचा हिमालय काकांना दिसतच नाही…, याची कल्पना महाराष्ट्राच्या जनतेला नाही. महाराष्ट्राच्या भोळ्याभाबड्या जनतेला हिमालय म्हणजे पर्वत वाटला… काकांचे राख फासणे म्हणजे संन्यास घेणे वाटले… पण प्रत्यक्षात काकांनी राख आपल्या स्वतःच्या केलेला घोषणेला फासली आणि ते आपल्या हिमालयाच्या म्हणजे अर्थातच 10 जनपथच्या सावलीत जाऊन विसावले…!!

पण हे सगळे काकाभक्तांना आठवण्याची किंवा आठवले तरी ते कबूल करण्याची बुद्धी होणार नाही. कारण शेवटी भव्य हिमालय तुमचा आमुचा असला तरी ज्याची त्याची “बारामती” वेगळी आहे ना…!!त्यामुळे त्या मतीनुसार प्रत्येकाची आपापले “हिमालय” ठरविण्याची कुवत असते…!!

तसेही एरवी काका आपण “राष्ट्रीय” राजकारणातले फार मोठे नेते आहोत, असे भासवत असतातच ना… पण काकांनी केलेला विकास पाहायचा असेल तर तो देशात नाही, महाराष्ट्रातही नाही, तर फक्त बारामतीत जावे लागते ना…!! पंतप्रधान मोदींपासून ते वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांपर्यंत प्रत्येकाच्या स्वागताला काका बारामतीतच उभे असतात ना…!!

याचा अर्थ उघड आहे, भले चंद्रकांत दादांनी आता हिमालयाकडे कूच करावे, असे काकाभक्तांना वाटत असेल, पण शेवटी चंद्रकांत दादांचा “हिमालय” वेगळा आहे. तो 7, लोककल्याण मार्गावर स्थित आहे आणि ज्याची त्याची “बारामती” वेगळीच आहे, हेच यातून स्पष्ट होते ना…!!

Sharad Pawar – Chandrakant Patil: The magnificent Himalayas are yours, its “Baramati”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात