विशेष प्रतिनिधी
हैदराबाद/बंगळुरू : कर्नाटकपाठोपाठ आंध्र प्रदेशातही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. येथील कुर्नूल जिल्ह्यातील अलूर येथे दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर परिस्थिती हिंसक झाली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या चकमकीत १५ जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. Violence in Andhra after Karnataka Throwing stones at Hanuman Janmotsav procession
हनुमान जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढताना ही घटना घडल्याचे कर्नूलच्या एसपींनी सांगितले. यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २० जणांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची चौकशी केली जात आहे.
शनिवारी रात्री उशिरा कर्नाटकातील हुबळी येथेही दगडफेकीचा प्रकार घडला. येथील जुन्या हुबळी पोलिस ठाण्यावर अराज्य घटकांनी दगडफेक केली. या घटनेत चार पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त लभुराम यांनी दिली. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अचानक प्रचंड जमाव पोलीस ठाण्यात पोहोचला आणि दगडफेक सुरू केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यानंतर जमावाला हिंसक वळण लागले. या घटनेत चार पोलिस जखमी झाले आहेत. नंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडून जमावावर नियंत्रण मिळवले.
या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेटस टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी जमाव करत आहे. याशिवाय हॉस्पिटल आणि हनुमान मंदिरावर दगडफेक झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
४० जणांना अटक
पोलीस आयुक्त लभुराम म्हणाले की, पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. याप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ४० जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more