गणेशोत्सव : राष्ट्र जागरण उत्सव… सार्वजनिक गणेशोत्सव मूलभूत प्रेरणा मोहरम मध्ये नव्हे; तर वारकरी संप्रदायात!!


सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीवरून सध्या जरी विशिष्ट वाद नव्याने घातले जात असले, तरी हा उत्सव राष्ट्र जागरणाचा उत्सव आहे या विषयी कोणाचेही दुमत नाही. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवाची मूलभूत प्रेरणा नेमकी कोणती??, या विषयावर अगदी 1894 पासून वाद घातले गेले आहेत. हा उत्सव मुसलमानांविरुद्ध काढलेली टूम आहे, असा ठपका ब्रिटिशांनी ठेवला होता.Sarvajanik ganeshotsav : basic inspiration was taken from warkari sect. and not from moharam

वादावर टिळकांची सडेतोड उत्तरे

या वादावर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एकापाठोपाठ एक अग्रलेख लिहून सडेतोड उत्तरे देखील दिली आहेत. ब्रिटिशांच्या गुप्तहेर रिपोर्ट्स मध्ये व्हॅलेंटाईन चिरोल याने सार्वजनिक मंडळांची टूम मुसलमानांविरुद्ध काढल्याचे लिहिले आहे. “तुमचा मोहरम, तर आमच्या गणेशोत्सव”, असे स्वरूप ब्रिटिशांनी या उत्सवाला देण्याचा यातून प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. पण टिळकांनी मात्र सुरुवातीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूलभूत प्रेरणा या हिंदू धर्मातच आहेत, असे ठामपणे प्रतिपादन केले होते. किंबहुना वारकरी संप्रदाय जसे आषाढी – कार्तिकी वारी समुदायाने करतो, एक प्रकारे विठ्ठल भक्तीचा सामुदायिक अविष्कार घडवतो त्या प्रेरणेतूनच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याचे टिळकांनी स्पष्टपणे केसरीच्या अग्रलेखात नमूद केले आहे. त्याचवेळी गणेशोत्सवाच्या राष्ट्रीय प्रेरणा देखील त्यांनी उघडपणे विशद केल्या आहेत.



 टिळकांचे अग्रलेखातून परखड सवाल

“एकतर आमचे लोक काही करत नाहीत. केले तर ते सरकारला रुचत नाही. ते कोणतीही चळवळ करत असतील तर सरकार त्याला अटकाव करते. मग आमच्या समाजाने दुसरे करावे काय?? गणपती उत्सव हा आमचा धार्मिक उत्सव आहे आणि तो जनतेने एकत्र येऊन केल्यास सरकारने हरकत घेण्याचे कारणच काय? यात त्यांच्या विरुद्ध भीतीदायक काही नाही, तरी सरकार समाजाच्या एकत्र येण्याला का भिते??”, असा परखड सवाल टिळकांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या अग्रलेखांमध्ये विचारला आहे.

औद्योगिक प्रदर्शन

राष्ट्रीय प्रेरणेच्या अनेक गोष्टी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातच पहिल्यांदा सुरू केले. आज जगभरात औद्योगिक प्रदर्शनांचा बोलबाला आहे. पण हिंदुस्थानची लोकसंख्या जेव्हा फक्त 29 कोटी होती, साक्षरतेचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षाही कमी होते, शहरीकरण नावाला देखील नव्हते तेव्हा टिळकांनी भारताला आधुनिक जगात नेण्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सवात पुण्यामध्ये पहिले औद्योगिक प्रदर्शन भरवले होते आणि त्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी पुढाकार घेतला होता. या प्रदर्शनात महिलांनी निर्माण केलेल्या वस्तू आवर्जून ठेवण्यात आल्या होत्या.

व्याख्यानांना बंदी म्हणून प्रवचने

सार्वजनिक गणेशोत्सवात ब्रिटिशांनी व्याख्यानांवर बंदी घातली होती. कारण या व्याख्यानांचे विषय ब्रिटिशांना साम्राज्यशाही विरुद्ध असे वाटत होते ते विषय कसे होते देखील पण त्यावर सार्वजनिक गणेश मंडळांच्या धुरीणांनी तोडगा काढला त्यांनी विषय तेच ठेवले पण व्याख्यानाऐवजी त्याला “प्रवचन” म्हणू लागले. निमंत्रण पत्रिकांमध्ये देखील “व्याख्यान” ऐवजी “प्रवचन” हा शब्द घालू लागले. लोकमान्य टिळकांचे सहकारी “काळ”कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचे 1905 मध्ये गणेशोत्सवामध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य” या विषयावर नाशिकच्या भद्रकाली मंदिरात प्रवचन झाले होते.

 टिळकांची कर्मयोगावर प्रवचने

लोकमान्य टिळक प्रामुख्याने “भगवद्गीतेतील कर्मयोग” या विषयावर गणेशोत्सवात ठिकठिकाणीच्या मंडळांमध्ये जाऊन प्रवचने देत असत. या कर्मयोगात “राष्ट्र जागरणासाठी तरुणांनी नेमके काय करावे”??हा प्रामुख्याने विषय असे. टिळक, परांजपे, पांगारकर हे “व्याख्याने” देत नसत, तर “प्रवचने” देत असत. पुण्याच्या मंडी समोर टिळकांची अशी अनेक “प्रवचने” झाली. पण ब्रिटिश सरकारला त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करता आली नव्हती.

 टिळकांचे परखड बोल

1907 च्या गायकवाड वाड्यातील गणेशोत्सवात टिळकांनी आपल्या समाजालाच परखड बोल ऐकवले होते. “आमची स्थिती आम्हीच सुधारली नाही, तर सुधारलेली राष्ट्रे आम्हाला दारासमोर देखील उभे राहू देणार नाहीत. देशाशी कृतघ्न झालेल्या लोकांनी भूमीला भार होण्यापेक्षा दुसरे कोणी येऊन ती सनाथ करेल हा भ्याडपणा टाकून दिला पाहिजे. हे होण्यासाठी आपणच थोडी घस सोसली पाहिजे. त्यासाठी तुरुंगात जावे लागले, हद्दपार व्हावे लागले तर त्याला तुम्ही तयार असले पाहिजे. सोन्याचा कस आगीतच लागत असतो. तो काही कोणी भोजनाच्या ताटावर लावीत नाही”, टिळकांचे हे परखड बोल जनता ऐकून घेत होती आणि समाजमन हळूहळू घट्ट होत गेले. सार्वजनिक गणेशोत्सवाची फलश्रुती दिसायला सुरुवात झाली होती.

Sarvajanik ganeshotsav : basic inspiration was taken from warkari sect. and not from moharam

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात