सुप्रीम कोर्टाचा निर्णय : बेंगळुरूमधील चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला परवानगी नाही!!


वृत्तसंस्था

बेंगळुरू : चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नाही. कर्नाटक वक्फ बोर्डाने ही जागा आपली मालमत्ता असल्याचा दावा करून वर्षानुवर्षे येथे ईदची नमाज अदा केली जाते, असा युक्तिवाद केला. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने या मैदानावर यथास्थिती ठेवण्याचे आदेश देत हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टाकडे परत पाठवले आहे. Ganesh Chaturthi worship is not allowed at Chamarajpet Maidan in Bengaluru

तत्पूर्वी हायकोर्टाच्या एकल खंडपीठाने मैदानात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु खंडपीठाने सरकारला पूजेसाठी परवानगी मागणाऱ्या लोकांच्या अर्जांवर विचार करण्यास सांगितले होते. यानंतर राज्य सरकारने 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पूजेला परवानगी दिली होती. मात्र आता पुन्हा पूजेची परवानगी नाकारली आहे.

 वक्फ बोर्डाचा दावा

मैदान ही आपली मालमत्ता आहे. 1964 पासून येथे ईदची नमाज अदा केली जात आहे. पूजेमुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असा दावा वक्फ बोर्डाने केला आहे.

 कर्नाटक सरकारचा दावा 

राज्य सरकारने वक्फ बोर्डाचा दावा वादग्रस्त असल्याचे हायकोर्ट सांगितले होते. सरकारने म्हटले होते की, शासनाला पूजेला परवानगी देण्याचा विचार करण्यापासून रोखता येणार नाही.

मात्र, सुप्रीम कोर्टाने चामराजपेट मैदानावर यथास्थिती ठेवण्याचे आदेश देऊन संबंधित प्रकरण कर्नाटक हायकोर्टाकडे परत पाठविले आहे.

Ganesh Chaturthi worship is not allowed at Chamarajpet Maidan in Bengaluru

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!