गणेशोत्सव स्पेशल : “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात “मोदी एक्सप्रेस” कोकणाकडे रवाना!!


प्रतिनिधी

मुंबई : “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत आज, रविवारी चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. मुंबई भाजपाने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था केली. दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी हिरवा कंदील दाखवला. Modi Express” departs for Konkan in the wake of Ganapati Bappa Morya

मोदी एक्सप्रेसमधून एकूण १८०० प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले. या उपक्रमासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोकणवासीयांचा ‘मोदी एक्सप्रेस’ला प्रतिसाद

मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. गतवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. त्याला कोकणवासीयांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरणमान्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी लाभ घेतला.

मुंबई भाजपाने मोदी एक्स्प्रेस चालविल्याबद्दल गणेशभक्तांनी या आनंद व्यक्त करताना भाजपने आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. “राज्यात गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. मोदी एक्सप्रेस या रेल्वेमुळे कोकणवासी आनंदी आहेत,” असे मत राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

Modi Express” departs for Konkan in the wake of Ganapati Bappa Morya

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात