पवन कल्याण, ज्युनिअर एनटीआर, नितीन कुमार रेड्डी यांच्या सदिच्छा भेटीसाठी; भाजप दक्षिण दिग्विजयाचा मार्ग टॉलिवूड मधून!!


भाजपचा दक्षिण दिग्विजयाचा मार्ग टॉलिवूडमधून निघतो आहे. सन 2022 च्या पूर्वार्धात पवन कल्याण आणि उत्तरार्धात ज्युनिअर एनटीआर आणि नितीन कुमार रेड्डी भाजपशी जवळीक करताना दिसत आहेत.Pawan Kalyan, Jr. NTR, Nitin Kumar Reddy for his goodwill visit; BJP South Digvijaya’s way through Tollywood!!

जाट प्रदेशाध्यक्षांची चर्चा

काही दिवसांपूर्वी भाजपने उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. तेथे जाट नेत्यांना त्या पदाची संधी दिली. या विषयाची हिंदी प्रसार माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली. तेवढी चर्चा अजून तरी दक्षिणेतल्या राजकीय हालचालींविषयी झालेली दिसत नाही. अर्थात या राजकीय हालचाली देखील अजून प्राथमिक अवस्थेत किंवा सुप्तावस्थेत आहेत. सध्या दक्षिणेतील टॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांच्या भाजप नेत्यांची टप्प्या टप्प्याने बैठक होताना दिसत आहेत. वर उल्लेख केलेले टॉलीवूडचे बडे अभिनेते पवन कल्याण, ज्युनिअर एनटीआर आणि नितीन कुमार रेड्डी यांनी अनुक्रमे केंद्रीय गृहमंत्री अमित आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याच्या बातम्या आहेत.



 पवन कल्याण प्रस्ताव

साधारण 2022 च्या एप्रिल महिन्यात आंध्रातील जनसेना पक्षाचे नेते अभिनेते पवन कल्याण यांनी तेलगू देशम, भाजप यांच्यासह छोट्या पक्षांची महाआघाडी आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी यांच्या सरकार विरुद्ध उभी करण्याचे प्रस्तावित केले होते. तो प्रस्ताव अजूनही ऑन आहे. याचा अर्थ पवन कल्याण यांची राजकीय महत्त्वाकांक्षा चंद्राबापू नायडू यांचीच यांच्या इतकीच प्रबळ होत चाललेली दिसत आहे. चंद्रबाबू नायडू देखील सलग दोन टर्म सत्ता गमावल्यामुळे राजकीय दृष्ट्या गलितगात्र आहेत. तेलगू देशम पक्षाचा राजकीय पाया आंध्र प्रदेशात भुसभुशीत झाला आहे. चंद्राबाबूंना पुन्हा आपल्या पक्षाला उभारी आणायची असेल तर सध्या तरी कोणत्यातरी आघाडी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे चंद्राबाबू यांना परत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडे खेचून आणण्याचे काम पवन कल्याण करू शकतात, अशी 2022 च्या एप्रिल महिन्यात चर्चा होती. ही चर्चा देखील अजून ऑन आहे.

अमित शहा + जयुनिअर एनटीआर भेट

एकीकडे पवन कल्याण यांच्या महाआघाडी करण्याच्या राजकीय हालचाली सुरू असताना ज्युनिअर एनटीआर हे पाचच दिवसांपूर्वी अमित शहा यांना हैदराबादेत भेटले. ही सदिच्छा भेट मानली असली तरी बाहुबली आणि आर आर आर असे पॉवरफुल सिनेमे दिलेल्या राजामौली यांचे वडील आणि आर आर आर सिनेमाचे पटकथाकार विजयेंद्र प्रसाद यांना भाजपने राज्यसभेत पाठवल्यानंतर ज्युनिअर एनटीआर अमित शहा यांना भेटणे याला राजकीय महत्त्व आहे.

नड्डा + नितीन कुमार रेड्डी भेट

अमित शहा ज्युनिअर एनटीआर यांच्या भेटीला पाच दिवस उलटून गेल्यानंतर आज टॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार नितीन कुमार रेड्डी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना भेटला आहे नितीन कुमार रेड्डी याची देखील ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. पण या सर्व भेटींमध्ये विशिष्ट सुसूत्रता आहे आणि ती समजायला फारसे अवघड नाही.

टॉलिवूडचा राजमार्ग

भाजपला हे कळून चुकले आहे की दक्षिण दिग्वजयाचा राजाकीय मार्ग टॉलिवूड मधून जातो. दक्षिणेमध्ये सर्वाधिक राज्यकर्ते हे सिनेसृष्टीतून वर आले. त्यांनी सुमारे 40-50 वर्षे आंध्र, तामिळनाडू तेलंगणा यांच्यावर राज्य केले. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीचा प्रभावच असा अमिट आहे की ते ओलांडून दक्षिणेतले राजकारण फारसे यशस्वी होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपने हाच टॉलिवूडचा “राजमार्ग” आक्रमायला सुरुवात केली आहे.

भाजपला संधी किती??

भाजपच्या दृष्टीने दक्षिणेतली ही नवी सुरुवात आहे. कारण पक्ष संघटना बांधणी देखील अजून प्राथमिक अवस्थेत आहे. अशा संघटनेला टॉलिवूड मधल्या दोन-तीन प्रभावी अभिनेत्यांच्या ग्लॅमरची साथ मिळाली तर भाजपला दक्षिणेकडे राज्यांमध्ये हातपाय पसरायला फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. भाजपला तशीही नजीकच्या भविष्यात दक्षिणेमध्ये फार मोठे यश अपेक्षितही नाही. पण भाजप केवळ उत्तरेतला हिंदी पट्ट्यातला म्हणजे काऊ बेल्ट मधला पक्ष आहे ही प्रतिमा मात्र भाजप दक्षिणेत राजकीय शिरकाव करून आणि प्रभावी संघटना बनवून नक्की पुसू शकतो. आणि नेमकी त्यासाठीच टॉलिवूड मधल्या सुपरस्टारची पक्षाला मदत होऊ शकते. गेल्या काही महिन्यांतील भेटीगाठी हे त्याचे राजकीय सूचक निदर्शक आहे, ज्याकडे माध्यमांचे अजून फारसे प्रभावी त्या लक्ष गेलेले नाही. अर्थात याचे नेमके फलित समजायला विशिष्ट अवधी देखील द्यावा लागणार आहे.

Pawan Kalyan, Jr. NTR, Nitin Kumar Reddy for his goodwill visit; BJP South Digvijaya’s way through Tollywood!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात