भाजपच्या ‘सोनार बांग्‍ला’ अभियानात गोलंदाज अशोक दिंडा आणि अभिनेत्री पायल सरकार सामील

  • भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक दिंडाचे  राजकीय पदार्पण 
  • पश्चिम बंगालमधील  मुख्य अभिनेत्रींपैकी एक पायल सरकार 

विशेष प्रतिनिधी 

कोलकाता : क्रिकेटच्या मैदानातून निवृत्तीची घोषणा करणारा माजी भारतीय वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे . दिंडाने काल केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आज गुरुवारी टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारने भाजप मध्ये प्रवेश केला आहे.Bowler Ashok Dinda and actress Payal Sarkar join BJP’s ‘Sonar Bangla’ campaign

कोलकाता  येथे गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेडी नड्डा यांनी  “सोनार बांग्ला मैनिफेस्टो क्राउडसोर्सिंग” मोहीम सुरू केली आहे. त्याच वेळी, पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल सरकार यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजप अध्यक्ष नड्डा म्हणाले, पश्चिम बंगालच्या गौरवशाली इतिहासात स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, नेताजी सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या योगदानाने आम्ही ‘सोनार बांगला’ बनवण्याच्या दिशेने काम करीत आहोत.

बंगालमध्ये आयुष्मान भारत आणि पंतप्रधान किसान योजना
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, आम्ही बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना राबवू. बंगालच्या शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही. ही योजना बंगालमध्ये लागू केली जाईल आणि येथील शेतकर्यांना जुना हप्ता उपलब्ध होतील असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

Bowler Ashok Dinda and actress Payal Sarkar join BJP’s ‘Sonar Bangla’ campaign

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*