एसटी कर्मचारी : वेतन निश्चिती करून शासनाप्रमाणे महागाई भत्ता द्या!!; मुख्यमंत्र्यांकडे मागणी


प्रतिनिधी

मुंबई : 92000 एसटी कर्मचाऱ्यांची रखडलेली वेतन निश्चिती करुन त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ST Employees : Pay Dearness Allowance as per Govt after fixing salary

६ महिने प्रदीर्घ संप करून एसटी कर्मचाऱ्यांच्या काहीच मिळाले नाही. त्यांना शासनाने दिलेली वेतनवाढ ही अनियमित व अत्यल्प असून, पूरक भत्ते आणि अनुषंगिक सुविधांसाठी त्याला पुन्हा आंदोलन करावे लागू नये, यासाठी त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

सध्या प्रमाणापेक्षा महागाई वाढली आहे. घरभाडे, किराणा सामान, औषधोचार व मुलांच्या शिक्षणाचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. यावर एखादा अभ्यासगट किंवा समिती निर्माण केली पाहिजे. त्या समितीला मर्यादा ठरवून देत, अभ्यास पूर्ण अहवालाच्या आधारे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती पुरक भत्ते व अनुषंगिक सुविधांच्या बाबतीत निर्णय घ्यावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.

शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा

या बरोबरच गेली ३ वर्ष एसटीतील चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांना गणवेश किंवा गणवेशाचे कापड दिले गेले नाही. ते कापड त्यांना तातडीने द्यावे, याशिवाय शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा. अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती रक्कम त्वरित दिली पाहिजे कारण स्वतः व कुटुंबातील सदस्यांच्या औषधोचारासाठी अनेकांनी कर्ज काढले आहे.

विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या राहण्या- जेवण्याची प्रचंड गैरसोय होत असून, यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीने लक्ष घालून त्यांच्यासाठी चांगली विश्रांती गृहे व सुविधा निर्माण करण्यासाठी दुरुस्तीसाठी निधी प्राप्त करून द्यावा अशी विनंती सुद्धा बरगे यांनी केली आहे.

ST Employees : Pay Dearness Allowance as per Govt after fixing salary

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!