गुलाम नबी आझाद पक्षाबाहेर; काँग्रेसजनांचा सूर निराशेचा; गांधी परिवार समर्थकांचीही कुचंबणा!!


विनायक ढेरे

गुलाम नबी आझाद हे वरिष्ठ नेते काँग्रेस बाहेर पडल्यानंतर दिवसभरातला सूर पक्षांतर्गत निराशेचाच होता. मग भले अनेक नेते काँग्रेस मधल्या गांधी परिवाराचे कट्टर समर्थक असतील, त्यांचाही सूर बराच कुचुंबलेला होता. Ghulam Nabi out of Azad Party; The tone of the Congressmen is one of despair

एरवी गुलाम नबी आझाद यांच्यासारखा वजनदार नेता जर काँग्रेस सत्तास्थानी असताना बाहेर पडला असता तर काँग्रेस मधल्या गांधी परिवार समर्थकांनी किंबहुना काँग्रेसच्या कट्टर नेत्यांना जोरदार निषेधाचाच सूर काढला असता. इंदिरा गांधी यांच्यापासून राजीव गांधी तसेच वेगवेगळ्या काँग्रेस श्रेष्ठींच्या काळात ही “परंपरा” काँग्रेसजनांनी जपली होती. पण आज जेव्हा काँग्रेस पूर्णपणे राजकीय दृष्ट्या निष्प्रभ आहे, तेव्हा मात्र एखादा वजनदार नेता पक्षा बाहेर पडत असेल तर पक्षामध्ये प्रचंड निराशेचा सूर उत्पन्न होतो, तशीच निराशा आज पक्षात पसरलेली दिसत आहे.


गुलाम नबी आझाद : काँग्रेस मधून कायमचे “आझाद” होऊन कुणाची “गुलामी” करणार??


जयराम रमेश यांची प्रतिक्रिया

खुद्द काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी गुलाब नबी आझाद यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आणि चुकीच्या राजकीय टाइमिंगचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आझाद यांच्या निर्णयावर जपून टीका केली आहे.

 पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये आझाद यांचे ऐकायला हवे होते. काँग्रेसचा पक्षाध्यक्ष सर्वमान्य हवा. कळसुत्री बाहुली नको, असे पक्षश्रेष्ठींनाच सुनावले आहे. काँग्रेसमधल्या बाकीच्या नेत्यांनी याच पद्धतीचा सुर आळवून गांधी परिवाराचे जपून समर्थन केले आहे. काँग्रेसमधल्या एकूण निराशेचेच प्रतिबिंब गुलाब नबी आझाद यांच्या पक्ष सोडून जाण्याने प्रतिक्रियांमध्ये पडले आहे.

 काँग्रेसच्या राजकीय इतिहासातील विसंगती

काँग्रेसच्या राजकीय इतिहासातली ही फार मोठी विसंगती आहे. सत्तेवर असतानाचा काँग्रेस पक्ष आणि विरोधातला काँग्रेस पक्ष या दोन्ही काळात देखील इतकी गलीतगात्र अवस्था किंवा इतकी निराशेची अवस्था पक्षाने कधी पाहिलेली नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील या पद्धतीची अवस्था अनुभवलेली नाही. अशावेळी आझाद यांच्याकडून पक्षातल्या अन्य जेष्ठ नेत्यांची पक्ष सावरण्याची अपेक्षा होती. परंतु, आझाद यांनी थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरच आघात करून ते बाहेर पडत असल्याने गांधी समर्थकांचे देखील कुचंबणा झाली आहे. या निराशा आणि कुचंबणा या कात्रीत काँग्रेसचे सगळे नेते, कार्यकर्ते, गांधी परिवार आणि गांधी समर्थक अडकलेले दिसले आहेत!!

Ghulam Nabi out of Azad Party; The tone of the Congressmen is one of despair

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात