गणेशोत्सव स्पेशल : एसटीच्या 3500 गाड्या फुल्ल!!; पण खासगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांची दाम दुपटीने लूट!!


प्रतिनिधी

मुंबई/पुणे : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी तब्बल १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य मिळाले आहे. या सर्व गाड्यांमधून जवळपास दीड लाख गणेशभक्त कोकणात जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.Ganeshotsav Special : 3500 trains of ST are full!!; But passengers are robbed by double the price from private travels!!

पण त्याच वेळी प्रवाशांची प्रचंड मोठी संख्या पाहता एसटी महामंडळ त्यांना गाड्या पुरवायला कमी पडले असून खाजगी ट्रॅव्हल्सने याचा गैरफायदा घेत आपल्या भाड्यामध्ये दाम दुपटीने वाढ केली आहे. जेथे 700 – 800 रुपयांचे एसटीचे भाडे आहे, तिथे तब्बल 1500 ते 2700 रुपये भाडे खाजगी ट्रॅव्हल्सवाले आकारात आहेत. या विरुद्ध हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत दादर येथे जोरदार आंदोलन केले. त्यांच्याकडे प्रवाशांनी तक्रारींचा पाऊस पाडला होता. याची दखल घेऊनच हिंदू जनजागृती समितीने खाजगी ट्रॅव्हल्स विरुद्ध आंदोलन केले आहे. एसटी महामंडळाने जास्तीत जास्त गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात आणि नियमित भाड्याने घेऊनच गणेशभक्तांना कोकणात आपापल्या गावी पोहोचवावे, अशी मागणी समितीने केली आहे.



कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जात आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २ हजार ५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत तब्बल ३४१४ गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. या गाड्यांमधून सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत. , असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या लालपरीला सुरक्षित प्रवास म्हणून प्राधान्य दिल्याने चन्ने यांनी चाकरमान्यांचे आभार मानले.

सुरक्षित प्रवासासाठी विशेष खबरदारी

गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.

पण एवढे सगळे करूनही प्रवाशांची प्रचंड संख्या पाहता एसटी महामंडळाकडे पुरेशा गाड्या नाहीत. याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्सवाले घेताना दिसत आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी प्रवाशांनी आणि हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

Ganeshotsav Special : 3500 trains of ST are full!!; But passengers are robbed by double the price from private travels!!

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात