ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर एसटी आणि पीएमपी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस प्रणित संघटना आक्रमक


प्रतिनिधी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी पीएमटी कामगार संघटनेने (इंटक) पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे, ही मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. After the departure of Thackeray-Pawar government, Congress-led organizations are aggressive for the demands of ST and PMP employees

ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटना आणि इंटक ही संघटना कामगारांच्या मागण्यांसाठी आक्रमक बनल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी काँग्रेस प्रणित संघटनेने पगार वाढीची मागणी कालच केली आहे. त्याचबरोबर अन्य सवलतीही मागितल्या आहेत.

आंदोलनाचा इशारा 

पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पीएमपीदेखील या दोन्ही संघटनांचा एक भाग आहे. पीएमपीचे १० हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश काढावा, अशी विनंती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. सातवा वेतन आयोग लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, अशा इशारा इंटककडून देण्यात आला आहे.

वाहक भरती 

दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १६५० बसच्या माध्यमातून प्रवाशांना पीएमपीकडून सेवा दिली जाते. सध्या पीएमपीकडे 4100 वाहक आहेत. तरीही पीएमपीला वाहकांची आवश्यकता असून यामुळेच पीएमपीकडून आता आगामी काळात 2000 वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील 2000 तरुणांना रोजगार मिळणार आहे.

After the departure of Thackeray-Pawar government, Congress-led organizations are aggressive for the demands of ST and PMP employees

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!