कर्नाटकात 350 हून अधिक गणेश मंडळांमध्ये सावरकर बॅनर्सची धूम!!; युवा ब्रिगेडचा पुढाकार


प्रतिनिधी

बेंगळूर : कर्नाटकमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सावरकर या एकाच विषयावरून राजकीय धुमशान सुरू आहे. टिपू सुलतान आर्मी किंवा तत्सम नाव असलेल्या संघटनेने शिवमोगा येथे सावरकरांचे बॅनर फाडले. मुस्लिमबहुल भागात बॅनर का लावले म्हणून धिंगाणा घातला. Savarkar banners fly in over 350 Ganesha mandals in Karnataka

या पार्श्वभूमीवर YuvaBrigade च्या पुढाकाराने ३५० हून अधिक गणपती मंडळांनी मांडवात सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ रथयात्रा निघत आहेत. सगळे भेद बाजूला ठेऊन केवळ सावरकर या नावासाठी संपूर्ण हिंदू समाज एकत्र येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात त्यामुळे अधिक उत्साह भरला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांचे शिवमोगा येथे Sunitha Sumana यांनी भाषण आयोजित केले होते. सावरकरांचे लंडन मधले फोटो छापलेल्या वीर या टी-शर्टचे अनावरण यावेळी करण्यात आले.

सात्यकी सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे बिनबुडाचे आरोप होत आहेत, त्याचे खंडन तर केलेच शिवाय सावरकरांनी केलेली सामाजिक क्रांती आणि हिंदुत्व हेही समजावून सांगितले. हिंदुहिताचे राजकारण सावरकरांनी कसे केले आणि मुस्लिम लीगला कसा शह दिला हेही पुरावे देऊन सांगितले. Chakravarthy Mithun यांचेही जोरदार भाषण झाले. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Savarkar banners fly in over 350 Ganesha mandals in Karnataka

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”