रावणाची बेंबी, ईडी घरगडी, मर्दाची लढाई हे सगळे मुख्यमंत्री बोलले… पण कायद्याचं बोलले का…??


महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाजवले… पण ते अखेरीस…!! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक पेनड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकाच तडाख्यात फडणवीसांना जोरदार भाषण करून विधानसभेत प्रत्युत्तर दिले. रावणाची बेंबी, ईडी घरगडी, मर्दाची लढाई, कुटुंबियांना त्रास, मांडीला मांडी हे सगळे “बाण” शिवसेनेच्या धनुष्यावर ताणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानसभेतल्या भाषणात भाजपला मारले… इतकेच काय पण तुमच्या नेत्याला बाळासाहेबांनी वाचविले… बाळासाहेबांनी मुंबई वाचवली… शिवसैनिकांची जबाबदारी मी घेतो… ही सगळी जोरदार फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली…!!Ravana’s bembi, ed ghargadi, men’s battle are all mentioned by the Chief Minister … but did he speak of law

पण मुद्दा त्या पलिकडचा आहे मुख्यमंत्री “कायद्याचं काही बोलले का…??” ज्या कायद्यात चौकटीत राहून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारवाया केल्या आहेत त्या कायद्याला मुख्यमंत्र्यांनी काही आव्हान दिले का…?? ईडी घरगडी असे शब्दप्रयोग वापरून ईडीच्या कारवाया थांबणार आहेत का…??, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिलीच नाहीत…!!विधानसभेत शिवतीर्थ स्टाईल भाषण

विधानसभेच्या सदनात मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवर केल्यासारखे भाषण केले. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये जोश जरूर भरला गेला असेल, पण मुद्दा खरंच त्या पलिकडचा नाही का…?? ईडीने एकापाठोपाठ एक शिवसेना मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या प्रॉपर्टी अटॅच केल्या. त्याला कायदेशीर चौकटीत काही महत्त्व नाही का…?? शिवसेनेचे मंत्री आणि खासदार हायकोर्टात खेटे घालतात मग त्यांच्या प्रॉपर्टी ते सोडवू का शकत नाहीत…?? ईडीचे कायदे फक्त केंद्रातल्या मोदी सरकारने ठरवले आहेत का…??, या प्रश्नांवर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत.

कुटुंबाला कायदेशीर त्रासातून कसे वाचवणार

शिवाय मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात येतो हे मुख्यमंत्री म्हणाले. पण या त्रासातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कोणते कायदेशीर उपाय करणार आहेत…??, याविषयी त्यांनी काही सांगितले का…?? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत.

 पेनड्राइव्ह बॉम्ब विधानसभेत फोडले आरोप कोर्टात सिद्ध करणार!!

विधानसभेच्या सदनात देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्ब फोडले. जोरदार आरोपांची भाषणे देखील केली. पण आरोप सिद्ध करण्याचे विधानसभेचे सभागृह हे ठिकाणच नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच वेळी जाहीर केले होते, या सगळ्या बाबी आम्ही कोर्टात देऊ. त्यानुसार एकेक करून केसेस कोर्टात गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यापर्यंत येऊन कारवाया ठेपल्या आहेत. ज्या शिवसेनेच्या आमदाराने भाजपशी पुन्हा युती करण्याची कळकळीची विनंती केली होती त्या प्रताप सरनाईक यांच्या घरापर्यंत कारवाई येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांमध्ये तोंडी जोश भरण्यापेक्षा दुसरे काय केले…??, या सवालाचे देखील उत्तर त्यांच्याकडून मिळाले नाही.

न्यायव्यवस्थेवर विश्वास… मग??

इतकेच काय तर संजय राऊत म्हणाले होते, या देशातल्या न्याय व्यवस्थेकडून आम्हाला न्याय मिळण्याची शक्यता नाही. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सदनात न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे असे म्हटले आहे. मग ज्या न्यायव्यवस्थेवर मुख्यमंत्री विश्वास ठेवतात त्याच न्यायव्यवस्थेने नवाब मलिक, अनिल देशमुख यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. मग त्यानुसार नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला नको का…?? मुख्यमंत्री म्हणाले, नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ पण आरोप खोटे आहेत. ज्या हायकोर्टाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला त्यावरच ही टिप्पणी नाही का…??

 ग्यानबाची मेख

म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाजपवर एकापाठोपाठ एक जोरदार तोंडी तोफा डागल्या. त्यात दाउद पासून राम मंदिरा पर्यंत सगळे विषय छेडले. पण पत्ता आणि मुद्दा मात्र बोलायचा आणि त्याहीपेक्षा करायचा राहूनच जातो आहे… तो म्हणजे “कायद्याचं बोला…!!” ते कायद्याचंच मुख्यमंत्री बोललेले दिसले नाहीत…!! आणि महाराष्ट्रातल्या ईडी कारवायांमध्ये हीच खरी ग्यानबाची मेख आहे…!

Ravana’s bembi, ed ghargadi, men’s battle are all mentioned by the Chief Minister … but did he speak of law

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण