विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध गायक पद्मश्री सोनू निगम यांना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून धमकी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टच्या मुद्द्यावरून चहल यांच्या भावाने सोनू निगमला धमकी दिली . दरम्यान, या दोघांची ओळख महापालिका आयुक्तांनीच करून दिली होती .त्यानंतर त्यांच्या भावाने सोनू निगम यांना धमकीचे संदेश पाठवले सोबतच कॉलही केले.त्याचे रेकॉर्डिंग सोनू यांच्याकडे आहेत .मात्र सोनू यांनी त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदवली नाही कारण सोनू निगम हे महापालिका आयुक्त चहल यांचा आदर करतात असे सोनू यांनीच सांगितले आहे.SONU NIGAM: Municipal Commissioner Iqbal Singh Chahal’s brother threatens Sonu Nigam! The introduction was made by the commissioner himself …
मिळालेल्या माहितीनुसार महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी त्यांचा चुलत भाऊ राजेंदरला सोनू निगमची भेट घालून दिली होती. या भेटीनंतर राजेंदरने सोनू निगमकडे परदेशात संगीत कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करण्याचा आग्रह केला होता.
सोनू निगमचं आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टचं काम प्रमोटर रॉकी बघतो. त्यामुळे सोनू निगमने राजेंदरला प्रमोटरसोबत बोलून घेण्यास सांगितलं. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राजेंदरला सोनू निगमने दिलेलं उत्तर आवडलं नाही. त्यानंतर त्याने सोनू निगमला असभ्य भाषेत मेसेज पाठवले.
सोनू निगमला राजेंदरने पाठवलेल्या मेसेजमधील भाषा असभ्य असून, त्याच्या बोलण्याचा सूर धमकीवजा असल्याची माहिती आहे. राजेंदरने पाठवलेले मेसेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंगही सोनू निगमकडे असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका आयुक्तांबद्दल आदर असल्याने सोनू निगमने अद्याप तक्रार केलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App