विधान परिषद : शिवसेनेच्या जखमेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मलमपट्टी; तरीही महाविकास आघाडीच्या एकीत बेकी!!; ही बेकी नेमकी हवीये कोणाला??


नाशिक : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला हा पराभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्या जखमेवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांनी मला मिळवण्याचा प्रयत्न केला आहे पण तरीदेखील महाविकास आघाडीच्या एकीत जी बेकी व्हायची आहे ती झालीच आहे.Rajyasabha Elections : NCP and independents played game with Shivsena but Congress will have to pay the price

अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाल्यानंतर महाविकास आघाडीत अशी बेकी व्हावी हे नेमके कोणाला अपेक्षित आहे??, हे सार्‍या महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांनी मतदानाच्या आदल्या रात्री राष्ट्रवादीचा मतांचा कोटा वाढवून घेतलं प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी करून घेतली तसेच राष्ट्रवादीच्या समर्थक अपक्ष आमदारांनी शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला मते दिली नाहीत. यातच या प्रश्नाचे खरे उत्तर दडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



विधान परिषदेत फटका काँग्रेसला

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे नाराज झालेली शिवसेना आक्रमक झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत तुमचे तुम्ही बघा अशा शब्दांत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुनावले आहे. शिवसेनेने हा इशारा खरंच अमलात आणला तर राष्ट्रवादीचा नव्हे तर काँग्रेसचा जादाचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. याचा फटका भाई जगताप किंवा चंद्रकांत हांडोरे यांच्यापैकी एकाला बसू शकतो.

 शिवसेनेचा आघाडीवरील विश्वास उडाला 

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला हवी तशी मदत केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करुन शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायला तयार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधान परिषदेत आपापले बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

 भाजपच्या आत्मविश्वासात वाढ

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा सहावा उमेदवार पराभूत झाल्याने हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार उभा केला होता. सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडे मते असताना शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. तर भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. त्यामुळे भाजपचा कमालीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांच्याकडे जास्तीची मते नसताना महाविकास आघाडीतील आमदारांनी मदत केल्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे.

Rajyasabha Elections : NCP and independents played game with Shivsena but Congress will have to pay the price

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात