विधान परिषद निवडणूक : दुधाने तोंड पोळले तरी संजय राऊत ताक फुंकून प्यायला शरद पवारांकडे!!


नाशिक : “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, “दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात”, वगैरे वाक्प्रचार सर्वसामान्य माणसांसाठी असतात. राजकीय नेत्यांसाठी विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांसाठी तर ते अजिबात लागू होत नाहीत. म्हणूनच आम्ही शेकडो निवडणुका लढवल्या आहेत. निवडणुका कशा लढवायच्या ते शिकवू नका, असे संजय राऊत म्हणाले होते. त्याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीत दिसून आला आहे पण एवढे होऊनही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये फारशी सुधारणा झाल्याचे दिसत नाही. Rajyasabha Elections : though sharad Pawar dumped Shivsena, sanjay Raut discussing state council elections with him

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पहिल्या पसंतीची मते त्यांना दिली नाहीत. या निवडणुकीत शिवसेनेचे तोंड दुधाने पोळले तरी ताक फुंकून प्यायला संजय राऊत शरद पवारांकडे गेले आहेत. 20 जून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी निवडणुकीची चर्चा करण्यासाठी संजय राऊत पवारांकडे पोहोचले आहेत.



संजय राऊत काठावर पास

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत हे पहिल्या पसंतीची मते घेऊन निवडून येतील असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात राऊत हे काठावरच पास झाल्याचे दिसून आले. जर राऊत यांना एक मत जरी कमी पडले असते, तरी ते धोक्यात पोहोचले असते. विशेष म्हणजे त्यांना पहिल्या पसंतीची मते असतानाही सहाव्या क्रमांकावरील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याही पेक्षा कमी मते राऊत यांनी पडली आहेत.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार आणि भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये लढत होती. यापैकी सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये चुरस होती.

निकालाने हवा काढली

परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रफुल्ल पटेल, प्रतापगढी आणि संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची मते मिळणारच होती. पण यातील राष्ट्रवादीचे पटेल यांना ४३ आणि प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली. परंतु महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार ज्यांना पहिल्या पसंतीची मते देण्यात येणार होती, त्या संजय राऊत यांना केवळ ४१ मते मिळाली. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेल्या शिवसेना आणि संजय राऊत यांची निकालाने हवाच काढली.

– राऊतांपेक्षा महाडिकांना जास्त मते

तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे निवडून येणार आणि राज्यसभेत शिवसेनेची एक जागा वाढणार, असा दावा पक्षाने केला होता. परंतु पवार यांना ३३ मते आणि भाजपचे महाडिक यांना ४१ मते मिळाली. महाडिक यांना मिळालेल्या मतांची पूर्णांकामध्ये संख्या जाणून घेतल्यास, संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपच्या दुसऱ्या पसंतीची मते घेणाऱ्या महाडिक यांनी जास्त मते मिळवली,असे दिसून आले आहे.

– भुजबळांनी राऊतांना डिवचले

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांना आमचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यापेक्षा कमी मते मिळाल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही आम्ही सहावी जागा मिळवण्यात कमी पडलो आणि राऊत हे थोडक्यात वाचले असल्याचे सांगितले. संजय पवार हे जिंकले असते आणि राऊत हे हरले असते,असेही त्यांनी म्हटले आहे.

– संजय राऊत झाले ट्रोल

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्हाला कोणी शिकवू नये, निवडणूक कशी लढवायची हे आम्हाला माहीत आहे. अशा किती निवडणूका आम्ही लढलो आहोत,असे सांगितले होते. परंतु एवढ्या निवडणुकांचा अनुभव असलेल्या शिवसेनेच्या आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला काठावर पास होण्याइतपत मते मिळवता आली. मग कुठे गेला तो एवढ्या निवडणूक लढवण्याचा अनुभव, असा सवाल करत राऊत यांना सोशल मिडियात ट्रोल केले जात आहे.

– पवारांच्या शब्दावर विश्वास कसा ठेवणार?

एवढे सगळे होऊनही म्हणजे राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या डावपेचाचा प्रतिकूल अनुभव येऊनही 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी संजय राऊत हे शरद पवार यांच्याकडे गेले आहेत. 2 वर्षांपूर्वी शिवसेनेच्या शब्दावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 खासदार स्वतः शरद पवार आणि फौजिया खान हे बिनबोभाट राज्यसभेवर पोहोचले होते. परंतु, 2 वर्षानंतर आज 2022 च्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांच्या शब्दावर विसंबून राहिलेल्या शिवसेनेला एका जागेवर हार पत्करावी लागली आहे. तरी देखील विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी संजय राऊत शरद पवारांकडे गेले आहेत. पवारांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवणार याचा हा प्रश्न सर्व महाराष्ट्राला पडलेला असताना संजय राऊत यांना मात्र हा प्रश्न पडलेला दिसत नाही. आता याचा परिणाम काय होतो हे 20 तारखेच्या सायंकाळीच दिसून येण्याची शक्यता आहे.

Rajyasabha Elections : though sharad Pawar dumped Shivsena, sanjay Raut discussing state council elections with him

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात