राज्यसभा निवडणूक : पवारांनी प्रफुल्ल पटेलांसाठी मतांचा कोटा बदलल्याची चर्चा; मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप!!


प्रतिनिधी

मुंबई : 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे 3 खासदार अलगदपणे शिवसेनेच्या पाठिंब्याच्या बळावर राज्यसभेत पाठविणाऱ्या शरद पवार यांनी आपले नंबर 2 प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचा मतांचा कोटा 42 वरून 44 केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप झाल्याच्या बातम्या आहेत.Rajya Sabha elections: Discussion that Pawar changed the quota of votes for Praful Patel; Huge rage of CM

शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मतदानाचा कोटा रात्री बदलल्याने शिवसेनेचा दुसरा उमेदवार अडचणीत आला आहे. परंतु मतांचा कोटा बदलाबदलीत राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला शब्द वाहून गेल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या विषयी अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत असून पवारांनी खरंच मतांचा कोटा बदलून त्यांच्या जुन्या वळणाच्या विश्वासघातकी राजकारणाचा महाविकास आघाडीत शिरकाव केला आहे आहे का?, अशी चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या जादा उमेदवार फौजिया खान यांना बिनबोभाट पाठिंबा दिला आणि राज्यसभेत पाठवले. त्या बदल्यात 2 वर्षानंतर म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेचा जादाचा उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचे ठरले होते. हा शब्द पवारांनी शिवसेनेला दिला होता. परंतु मधल्या काळात संभाजीराजे राजकीय एपिसोड आणि त्यानंतर आता मतांचा कोटा बदलणे यातून पवारांनी आपल्या जुन्या वळणाचे वेगळे राजकारण शिजवल्याचा राजकीय होरा निरीक्षकांनी बांधला आहे.

शिवसेना नेत्यांची पवारांची भेट

परंतु यामुळे शिवसेनेचा विश्वासघात झाला झाल्याने शिवसेनेत प्रचंड संताप उसळला आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि अन्य नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते. पण प्रत्यक्षात पवारांनी राष्ट्रवादीचा मतदान कोटा बदलला की नाही यातली नेमकी बातमी प्रत्यक्ष मतदाना नंतरच किंबहुना निकालानंतरच समोर येण्याची शक्यता आहे.

Rajya Sabha elections: Discussion that Pawar changed the quota of votes for Praful Patel; Huge rage of CM

महत्वाच्या बातम्या

`

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात