राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांची एकजूट ही सोनियांची इच्छा; पहिली बैठक मुंबईत पवारांच्या घरी!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात एका बाजूला राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मतदानाच्या आदल्या दिवशीच राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्याने आता याही निवडणुकीसाठी विरोधकांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या राष्ट्रपती निवडणुकीला सर्व विरोधकांनी एकजुटीने सामोरे जावे अशी सोनिया गांधींची इच्छा आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपला कसलीही चिंता नाही,Presidential election: Sonia wants unity of opposition; First meeting at Pawar’s house in Mumbai !!

मात्र विरोधक संघटीत होण्याच्या तयारीत आहेत. सोनिया गांधी यांच्या इच्छेनुसार राष्ट्रपती निवडणुकीला विरोधकांची पहिली बैठक शरद पवारांचा मुंबईच्या निवासस्थानी झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे त्याच बरोबर समविचारी पक्षांचे नेते डीएमकेचे एम. के. स्टालिन, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आदी नेत्यांशी बोलणार आहेत.



राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा

विरोधकांची आधी समविचारी पक्षांची बैठक होईल आणि नंतर राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरवण्यात येईल, असे सोनिया गांधी यांनी सांगितल्याचे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शरद पवार यांनीही यावेळी विरोधक संघटीतपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, असे स्पष्ट केले.

राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, सहाव्या जागेसाठी चुरशीचा मुकाबला असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहायला मिळू शकते. संसदेतील भाजप खासदारांची संख्या, अनेक राज्यांमधील आमदारांची संख्या पाहता ही निवडणूक भाजपला सोपी जाईल. मात्र या निवडणुकीसाठी विरोधकही कामाला लागले आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीला सर्व विरोधक एकजुटीने सामोरे जाणार असले तरी त्यांची एकवटलेली ताकद देखील भाजप पुढे कमी आहे त्यामुळे ही निवडणूक विरोधकांना अवघड जाईल हे उघड आहे तरीदेखील विरोधकांची एकजूट आहे हे दाखवण्याची संधी सर्व पक्षांना उपलब्ध झाली आहे. विरोधक कशाप्रकारे एकजूट दाखवतात की एकीत बेकी करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी केव्हा होणार निवडणूक?

निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर केली आहे. १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई असलेले पेन देण्यात येईल. मतदान करताना लोकप्रतिनिधींना १,२,३ असा पसंतीक्रम ठरवता येईल. पहिली पसंती न सांगितल्यास मत रद्द ठरवले जाईल.

Presidential election: Sonia wants unity of opposition; First meeting at Pawar’s house in Mumbai !!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात