प्रियंका गांधी यांचे बेगडी गो प्रेम; सॉफ्ट हिंदूत्वाचा डाव खेळण्यासाठी शेअर केली गायींच्या मृत्यूची फेक न्यूज!


  • उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील मृत गाईचे फोटो पोस्ट करत प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की गाईच्या मृत्यूने मी व्यथित झाले आहे.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : सॉफ्ट हिंदूत्वाचा राहूल गांधी यांचा डाव गेल्या लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाला नाही. तरीही आता उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांवर डोळा ठेऊन प्रियंका गांधी- वड्रा यांनी गो प्रेमाच्या माध्यमातून पुन्हा हा डाव खेळण्याचे ठरविले आहे. मात्र, खोट्या पायावर हा सगळा खेळ उभा केला आहे.

Priyanka Gandhi shared Fake news of death of cows  

उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील मृत गाईचे फोटो पोस्ट करत प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की गाईच्या मृत्यूने मी व्यथित झाले आहे. याबाबत त्यांनी मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले आहे. फोटोंचा हवाला देत म्हटले आहे की उत्तर प्रदेशातील गोशाळा या भ्रष्टाचाराचे आगर बनल्या आहेत. गोरक्षेमध्ये उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे.

मात्र, प्रियंका गांधी यांचा हा सगळा खेळ खोट्या पायावर असल्याचेही उघड झाले आहे. त्यांनी स्वत:च म्हटले आहे की या गाईचा मृत्यू कसा झाला हे मला माहित नाही, परंतु चारा-पाणी मिळाले नसल्याने भुकेने झाला असल्याचा माझा अंदाज आहे. मात्र, प्रियंका गांधी यांनी दिलेली माहितीच चुकीची आहे. ललितपूर गोशाळेच्या मुख्य पशुसंवर्धन अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार गोशाळेत किंवा आसपासच्या परिसरात कोठेही गाईचे मृतदेह सापडलेले नाहीत.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे बेगडी गो प्रेम अचानक उफाळून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच गाईबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी खोट्या बातम्यांच्या आधारे प्रियंका गांधी यांनी पत्र लिहिले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रियंका यांचे भाऊ आणि कॉँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहूल गांधी यांनी मंदिरदर्शनाचे दौरे केले होते.

Priyanka Gandhi shared Fake news of death of cows

…तेव्हा भररस्त्यात गाय कापून मांस शिजविले होते!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार शलभ मणी त्रिपाठी यांनी कॉँग्रेसवर हल्लाबोल करत दुतोंडीपणा दाखवून दिला आहे. केरळमधील घटनेचा संदर्भ देऊन ते म्हणाले कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात गाय कापून मांस शिजवून ते लोकांमध्ये वाटले होते. २०१७ मध्ये हे घृणास्पद कृत्य कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केले होते. आता त्यांना गो प्रेमाचा पुळका आला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात