ब्रिटनच्या राजघराण्यातून बाहेर पडलेले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल लग्नाचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करणार आहेत. कोरोनाच्या लाटेशी सामना करत असलेल्या मुंबईच्या मदतीसाठी कोविड मदत केंद्र सुरू करणार आहेत. Prince Harry and Megan Markle to celebrate their wedding anniversary, to set up Covid Help Center in Mumbai
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: ब्रिटनच्या राजघराण्यातून बाहेर पडलेले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल लग्नाचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करणार आहेत. कोरोनाच्या लाटेशी सामना करत असलेल्या मुंबईच्या मदतीसाठी कोविड मदत केंद्र सुरू करणार आहेत.
लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त भारतामध्ये विविध स्वरुपातील मदत करण्याचे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ठरविले आहे. त्याची सुरूवात मुंबईतून करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईमध्ये इमारात बांधण्यात येणार आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या आर्चवेल फाउंडेशन आणि वर्ल्ड सेंट्रल किचनचे मदत केंद्र मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे.या मदत केंद्रातून गरजूंना जेवण, वैद्यकीय मदतीसह करोना प्रतिबंधक लसही देण्यात येणार आहे.
हॅरी आणि मेगन यांनी आपल्या आर्चवेल या संकेतस्थळावर ही घोषणा केली आहे. या कोविड मदत केंद्रामुळे गरजूंना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात करोना लशीचे समान वितरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. औषध कंपन्यांनी गरीब देशांसाठी पेटंटला तात्पुरती स्थगिती देऊन लस उपलब्ध करण्याचे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केले होते. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी बायडन यांच्या आवाहनाचे स्वागत केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App