बेदखलपात्र व्यक्ती ते रणनीती केंद्रीभूत विचारवंत हे सावरकर वादाच्या प्रवासाचे राजकीय वैशिष्ट्य ठरले आहे. देशाची मूलभूत ओळख, देश उभारणीची मूलभूत चौकट सावरकर वादाकडे विस्तारताना दिसतेय. अटलजी म्हणाले होते, सावरकर हे केवळ व्यक्ती नाहीत, एक विचार आहेत. सीमित नाहीत. विस्तार आहेत. हे आता केवळ वैचारिक आणि भाषणाच्या पातळीवर राहिलेले नाही तर देशाच्या सरकारी धोरणात १००% परिवर्तित होताना दिसतेय. Persona non grata to strategy centric Persona; Political journey of Savarkar controversy … !!
देशातील 41 ऑर्डिनन्स फँक्टरीचे ७ कंपन्यांमध्ये रूपांतर, त्यांना ६५००० कोटी रूपयांची संरक्षण सामग्री निर्मिती – उत्पादन आणि निर्यातीची पहिली ऑर्डर देणे, संरक्षण धोरणात आत्मनिर्भर भारत संकल्पना साकारणे हे सावरकर वादाचे विस्तारीकरण आहे आणि हे नामश्रेय देऊन सुरू आहे. राजनाथ सिंह म्हणालेत, सावरकरांनी विसाव्या शतकात देशाला आक्रमक परराष्ट्र नीती आणि संरक्षण नीती सांगितली. देशाला उपयुक्त परराष्ट्र आणि संरक्षण नीती देणारे ते पहिले विचारवंत ठरले. हेच ते धोरणकर्त्यांनी नामश्रेय देणे आहे. सावरकर म्हणाले होते, “राजकारणाचे हिंदूकरण – हिंदूंचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण तसेच उद्योग राष्ट्रीयीकरण…!!” मग आज दुसरे काय सुरू आहे?
हिंदुत्व राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहे. हिंदूंचे सैन्यबळ वाढविणे सुरू आहे. औद्योगिकीकरण चरमसीमेवर आहे आणि संरक्षण उद्योग राष्ट्रीयीकरण होत आहे. Climate change मध्येही औद्योगिकीकरण होत राहील. त्याचे mould बदलतील. हिंदुत्व आता राजकीय केंद्रबिंदूवरून हलविणे विरोधकांनाही अशक्य आहे. सावरकर वाद फेकायला पुढे सरसावलेल्या विरोधकांनीच तो केंद्रबिंदूवर आणून ठेवला आहे.
नेहरूंनी सावरकरांना त्या वेळच्या राजकारणातून बेदखल करून सावरकर वाद धोरणात्मक पातळीवर दूर ठेवला होता. ते त्यांचे वैचारिक – राजकीय कौशल्य होते. पण त्यांच्या वारसांकडे ते अजिबात नाही. नेहरूंच्या वारसांकडे आहे, ते फक्त आक्रस्ताळे धोरण आणि त्याचे समर्थक. त्यांनीच हिंदुत्व आणि सावरकर वाद यांना अतिरिक्त विरोध करून तो भारतीय राजकीय वैचारिक परिप्रेक्षात केंद्रबिंदूवर आणून ठेवला आहे आणि तो तिथून हलविणे त्यांचे पूर्वज जरी खाली उतरले तरी आता शक्य नाही.
अर्थात हे भारतीय राजकारणाचे evolution आहे. ७० – ७५ वर्षांच्या राजकारणाचा तो परिपाक आहे. We made mistakes but then we learnt from it. असे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल डेल्मर क्रायस्लर म्हणाले होते. आपल्या राजकीय नेत्यांना देखील अनुभवातून आलेली ही प्रगल्भता आहे. नेहरू हे सावरकरांना व्यक्ती म्हणून पराभूत करू शकले, सावरकर वादाला हरवू नाही शकले…!! कारण सावरकर वाद मूलभूतच विचार म्हणून बळकट होता आणि आहे. नामश्रेय न देऊनही त्याला पराभूत करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते नेहरूही करू शकले नाहीत.
कुवतच नाही. ते फक्त आदळ आपट करत राहतात. पण त्या आदळ आपटीतूनच हिंदुत्व आणि सावरकर वाद हे नामश्रेयासकट भारतीय राजकारणाच्या केंद्रबिंदूवर येत राहतात. …आणि हाच Persona non grata to strategy centric Persona सावरकर वादाचा राजकीय प्रवास आहे…!! आणि तो असाच पुढे सुरू राहत विस्तारणार आहे. हा पोकळ आशावाद नाही तर ती देशाची राजकीय अपरिहार्यता आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App