Pakistan eight year old faces death penalty charged with blasphemy : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फक्त आठ वर्षांच्या मुलाला फाशीची शिक्षा होऊ शकते. ईश्वरनिंदाच्या आरोपाखाली न्यायालयात खटला चालणारे हे देशातील सर्वात लहान मूल ठरले आहे. हा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सध्या पोलीस कोठडीत आहेत. या मुलाला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, ज्याच्या निषेधार्थ मुस्लिम जमावाने पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील हिंदू मंदिरावर हल्ला केला. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. Pakistan eight year old faces death penalty charged with blasphemy hindu temple attack
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फक्त आठ वर्षांच्या मुलाला फाशीची शिक्षा होऊ शकते. ईश्वरनिंदाच्या आरोपाखाली न्यायालयात खटला चालणारे हे देशातील सर्वात लहान मूल ठरले आहे. हा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सध्या पोलीस कोठडीत आहेत. या मुलाला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, ज्याच्या निषेधार्थ मुस्लिम जमावाने पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील हिंदू मंदिरावर हल्ला केला. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, या आठ वर्षांच्या मुलाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्याने मदरसाच्या ग्रंथालयात लघवी केली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जमावाने मुलावर ईशनिंदा केल्याचा आरोप केला. यासंदर्भात पाकिस्तानमध्ये एक कायदा आहे, ज्याअंतर्गत फाशीची तरतूद आहे. यापूर्वीही या देशात ईशनिंदेची अनेक प्रकरणे घडली आहेत, ज्यात जमावाने हिंसाचार पसरवला आहे आणि प्राणघातक हल्ले केले आहेत. अशांतप्रवण रहीम यार खान जिल्ह्यातील भोंगमध्ये निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. येथील मंदिरावर हल्ला झाल्यापासून हिंदू लोक खूप घाबरले आहेत आणि त्यांना घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे.
मुलाच्या कुटुंबातील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनला सांगितले की, मुलाला ईशनिंदा म्हणजे काय हेही माहिती नाही आणि या प्रकरणात त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्याला अजूनही समजत नाही की, त्याचा गुन्हा काय आहे आणि त्याला एका आठवड्यापासून तुरुंगात का ठेवले आहे. आम्ही आमचे दुकान आणि काम सोडले आहे, संपूर्ण समाज घाबरला आहे. आम्हाला आता त्या भागात परत जायचे नाही. अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी काही केले जाईल किंवा गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जाईल, असे आम्हाला वाटत नाही.
ही बाब समोर आल्यापासून जगभरातील कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मुलावर लावण्यात आलेले ईशनिंदेचे आरोप खोटे आहेत, कारण या वयाच्या कोणत्याही व्यक्तीवर यापूर्वी ईशनिंदेचा आरोप लावण्यात आलेला नाही. मानवाधिकार संघटना दीर्घ काळापासून पाकिस्तानच्या ईश निंदा कायद्यावर टीका करत आहेत. याचे कारण असे की, या मुस्लिम बहुल देशात धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध याचा गैरवापर केला जात आहे. न्यायालयाने दोषी आढळलेल्या काही लोकांना फाशीची शिक्षा सुनावली असली, तरी आजपर्यंत कोणालाही फाशी देण्यात आलेली नाही.
Pakistan eight year old faces death penalty charged with blasphemy hindu temple attack
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App