यंदा कर्तव्य आहे! : बॉलीवूड अभिनेता रणबीर आणि आलिया या वर्षी करणार लग्न, या अभिनेत्रीने केले शिक्कामोर्तब

Ranbir kapoor and alia bhatt To get married this year says actress lara dutta

Ranbir kapoor and alia bhatt : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमसंबंधांच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहते अनेकदा दोन्ही स्टार्सना विविध ठिकाणी एकत्र पाहतही असतात. रणबीर आणि आलिया मीडियासमोर एकत्र पोज देतानाही दिसतात. दोघांचे लग्न कधी होणार याचीच चाहत्यांना उत्सुकता आहे. यावर आता अभिनेत्री लारा दत्ताने रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. Ranbir kapoor and alia bhatt To get married this year says actress lara dutta


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमसंबंधांच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहते अनेकदा दोन्ही स्टार्सना विविध ठिकाणी एकत्र पाहतही असतात. रणबीर आणि आलिया मीडियासमोर एकत्र पोज देतानाही दिसतात. दोघांचे लग्न कधी होणार याचीच चाहत्यांना उत्सुकता आहे. यावर आता अभिनेत्री लारा दत्ताने रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लारा दत्ता लवकरच अक्षय कुमार स्टारर बेल बॉटममध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. लारा यामुळेही सध्या चर्चेत आहे. लाराने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

काय म्हणाली लारा?

टाइम्सच्या बातमीनुसार, लाराने जाहीर केले की, तिच्या माहितीनुसार हे जोडपे (रणबीर-आलिया) या वर्षी लग्न करणार आहे. ती म्हणाली की, रणबीर आणि आलिया या वर्षी लग्न करणार असल्याची माझी खात्री आहे. लाराने यावेळी म्हटले की, ते ‘जुन्या पिढीतील’ आहेत, त्यामुळे आजच्या काळात कोणती जोडपी एकमेकांना डेट करत आहेत हे मला माहिती नाही. तरीही मी काही जोडप्यांबद्दल मात्र निश्चित सांगू शकते की, ते अजूनही एकत्र आहेत की नाही.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरच्या बातम्या जवळपास 4 वर्षांपासून चर्चेत आहेत. दोन्ही स्टार्सची पहिली भेट 2017 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर झाली. तेव्हापासून त्यांच्या अफेअर आणि लग्नाबद्दल चर्चा सुरू होत्या. या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे.

दरम्यान, जेव्हा ऋषी कपूर हयात होते तेव्हाही दोन्ही स्टार्सच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. त्याचवेळी एका मुलाखतीत रणबीरने स्वतःही असे म्हटले होते की, कौटुंबिक अडचणींमुळे आणि नंतर कोविडमुळे 2020 मध्ये तो लग्न करू शकत नाही, परंतु लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे.

Ranbir kapoor and alia bhatt To get married this year says actress lara dutta

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण