राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी बलात्कार करायचा असेल तर वारांगनांवर करा, पण सुसंस्कृत महिलांवर नको.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : वारांगणा आवाहन करतात की आमच्यावर बलात्कार करा परंतु सुसंस्कृत महिलांवर वाकडी नजर टाकू नका असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या ज्वाला धोटे यांनी केले आहे.जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी नागपूरमधील सेक्स वर्क महिलांसाठी आंदोलने केले. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाविरोधात घोषणाही दिल्या. ncp leader jwala dhote controversial statement over rape and sex worker in nagpur
माझ्या समस्त वारांगणा माता भगिनी नराधमांना आवाहन करतात की बलात्कार करायचा असेल, शरीराची भूक भागवायची असेल तर आमच्याकडे या पण सुसंस्कृत घरांमधील माता-भगिनींवर वाईट नजर टाकू नका. नराधमांची शरीराची भूक भागवण्यासाठी आम्ही आहोत. पण सुसंस्कृत घरांमधील महिलांवर वाईट नजर टाकू नका, असं ज्वाला धोटे म्हणाल्या.
नागपूर पोलिसांनी एका ६० वर्षीय महिलेवर तडीपाराची कारवाई केली होती, याचा निषेध करण्यासाठी ज्वाला धोटे यांनी नागपूरमध्ये आंदोलन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना धोटे म्हणाल्या की, माझ्या समस्त वारांगणा माता भगिनी आवाहन करतात या नराधमांना की, बलात्कार करायाचा असेल, स्वतःच्या शरीराची भूक भागवायची असेल तर आमच्यावर बलात्कार करा, परंतु सुसंस्कृत घरातील माता भगिनींवर वाईट नजर टाकू नका असे वादग्रस्त विधान धोटे यांनी केले आहे. तसेच या नराधमांची भूक भागवण्यासाठी आम्ही आहोत, परंतु चांगल्या घरातील महिलांवर वाकड्या नजरेने पाहून नका असे आवाहन या वारांगणा करत आहे असेही धोटे म्हणाल्या.
गृहमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
यावेळी ज्वाला धोटे यांनी आपल्या पक्षाच्य नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत, त्यांच्याविरोधात आणि आघाडी सरकारच्या विरोधात धोटे यांनी घोषणा बाजी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App