एकतर्फी प्रेमातून आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा नात्यातील तरुणाचेच खून केला. भर दिवसा लोकवस्तीत घडलेल्या या प्रकारात कोयत्याने गळ्यावर वार करत शीर धडपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.Murder of a 14-year-old girl in one-sided love, the act of a young relative
विशेष प्रतिनिधी
पुणे : एकतर्फी प्रेमातून आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा नात्यातील तरुणाचेच खून केला. भर दिवसा लोकवस्तीत घडलेल्या या प्रकारात कोयत्याने गळ्यावर वार करत शीर धडपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
क्षितिजा अनंत व्यवहार असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. क्षितिजा आठवीत शिकत होती. ती कबड्डी खेळाडू होती. मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. क्षितिजा हिची मैत्रीणही सोबत होती.
मात्र तिला धमकावत पळून लावत या तरुणाने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली. धडापासून मुंडके वेगळे करण्याचा प्रयत्न केला.
या मैदानावर लहान मुले कबड्डीचा सराव करीत होते.नागरिक चालण्यासाठी आले होते. मात्र कोणीही क्षितीजाच्या मदतीला गेले नाही. कोयता तेथेच टाकून आरोपी पसार झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App