पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष दोघेही राजकीयदृष्टया अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळेच इतर देशांना मोदींबद्दल इर्षा वाटते. या असूयेने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी केली जात असल्याचे अमेरिकन परराष्ट्र धोरणतज्ज्ञ डॉ. जॉन सी. हल्समन म्हटले आहे. भारत उगवती महासत्ता म्हणून पुढे येत असल्याचेही ते म्हणाले. Modi’s notoriety at the international level, jealousy of India as a rising superpower John C. Hullsman’s opinion
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष दोघेही राजकीयदृष्टया अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळेच इतर देशांना मोदींबद्दल इर्षा वाटते. या असुयेतूनच भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी केली जात असल्याचे अमेरिकन परराष्ट्र धोरणतज्ज्ञ डॉ. जॉन सी. हल्समन म्हटले आहे. भारत उगवती महासत्ता म्हणून पुढे येत असल्याचेही ते म्हणाले.
भारतातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी ‘अरब न्यूज’शी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप आणि मोदी इतके सुरक्षित आहेत की इतर देशांना त्यांच्याबद्दल असुया वाटत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढल्याचा थेट परिणाम भारतातील आरोग्य यंत्रणेवर पाहायला मिळाला. आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली. त्यावरून पाश्चिमात्य माध्यमांनी भारतावर कडवी टीका केली. पण तरीही भारतातील राजकीय यंत्रणा पूर्णपणे स्थिर आहे. ती अजिबात डळमळीत झालेली नाही
भारताला लोकसंख्येचादेखील फायदा मिळतो. २०२४ पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकलेलं असेल. भारताची ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या खाली आह. त्याचा फायदा होऊन २०५० पर्यंत संपूर्ण जगाच्या जीडीपीमध्ये भारताचं योगदान १५ टक्के असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर ११.५ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे, असेही त्यांनी सांगितले.
हल्समन म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाने ३७ टक्के मते घेऊन ३०३ जागा जिंकल्या. राहूल गांधी यांच्या कमकुवत नेतृत्वाखाली कॉँग्रेसला केवळ २१ टक्के मते आणि ५२ जागा मिळाल्या. बहुतांश राज्यांमध्येही भाजपा किंवा त्यांच्या सहयोगी पक्षाची सरकारे आहेत. भाजपाकडून परिणामकारक प्रचार यंत्रणा आधुनिक पध्दतीने चालविली जाते. डाटाचा वापर केला जातो. मोदी यांचे नेतृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. कॉँग्रेस या तुलनेत स्पर्धेतच नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अत्यंत सुरक्षित स्थितीत आहे. इतर विकसनशिल देशांमधील सत्ताधारी याची कल्पानही करू शकत नाही. त्यामुळेच मोदी यांच्याबाबत सगळ्यांच्या मनात असुया आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App