Mamata Banerjee Weds Socialism : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डावे राजकीय प्रतिस्पर्धी असू शकतात, परंतु त्यांच्या नामसाधर्म्याच्या व्यक्तींनी तामिळनाडूच्या सालेममध्ये केलेल्या लग्नामुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे. सालेम येथे समाजवाद नावाच्या व्यक्तीचे ममता बॅनर्जी नावाच्या तरुणीशी लग्न झाले आहे. इंग्रजी साहित्यात स्नातक पदवी मिळवलेली नववधू पी. ममता बॅनर्जी कॉंग्रेस समर्थकांच्या कुटुंबातून आहे. तिच्या पालकांनी तिचे नाव खऱ्या ममता जेव्हा कॉंग्रेसमध्ये होत्या, तेव्हा ठेवले होते. Mamata Banerjee Weds Socialism in tamilnadu salem viral marriage story
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डावे राजकीय प्रतिस्पर्धी असू शकतात, परंतु त्यांच्या नामसाधर्म्याच्या व्यक्तींनी तामिळनाडूच्या सालेममध्ये केलेल्या लग्नामुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे. सालेम येथे समाजवाद नावाच्या व्यक्तीचे ममता बॅनर्जी नावाच्या तरुणीशी लग्न झाले आहे. इंग्रजी साहित्यात स्नातक पदवी मिळवलेली नववधू पी. ममता बॅनर्जी कॉंग्रेस समर्थकांच्या कुटुंबातून आहे. तिच्या पालकांनी तिचे नाव खऱ्या ममता जेव्हा कॉंग्रेसमध्ये होत्या, तेव्हा ठेवले होते.
नववधू पी. ममता बॅनर्जीने माध्यमांना सांगितले की, ‘जेव्हा मी दहावीत होतो तेव्हा माझे मित्र माझ्या नावाबद्दल बोलत असत. त्यानंतर मला माझ्या नावाचे महत्त्व समजले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांविषयी जेव्हा वधू-वरांना मत विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘मी त्यांना बर्याचदा बातम्यांमध्ये पाहिले आहे. त्या एक सशक्त महिला आहेत. हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो.”
त्याच वेळी, 29 वर्षीय वराकडे वाणिज्य शाखेत पदवी आहे आणि ते चांदीच्या पैंजणांचा व्यवसाय करतात. तयाचे वडील ए. मोहन सालेममधील भाकपचे जिल्हा सचिव आहेत. मोहन यांनी मुलाचे नाव समाजवाद ठेवले, कारण त्या काळात सोव्हिएत संघ फुटला होता. कम्युनिझम आणि लेनिनवाद अशी मोहन यांच्या इतर दोन मुलांची नावे आहेत. मोहन म्हणाले की, लग्नाआधीच त्यांनी आपल्या मुलांसाठी अशी नावे ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
सामान्य पद्धतीने आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्यात वराचे म्हणणे होते की, राजकीय प्रतिस्पर्ध्यांची नावे त्यांच्या नावाशी निगडित आहेत, परंतु याचा परिणाम या दोघांवर होणार नाही. वर समाजवाद म्हणाला, ‘एकत्र येऊन आम्ही आनंदी आहोत. आम्ही सुखदु:खात एकमेकांची खंबीर साथ देऊ. काय घडेल याने काही फरक पडत नाही, आम्ही आयुष्यभर एकत्र राहू. तामिळनाडू सीपीआयचे प्रमुख आर. मुथारण आणि त्रिपुराचे खासदार के. सुब्बारायण यांच्यासह डाव्या पक्षांच्या अनेक नेत्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
Mamata Banerjee Weds Socialism in tamilnadu salem viral marriage story
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App