वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन याचा फटका रोजगाराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. सुमारे 75 लाख रोजगार बुडाले आहेत. एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्क्यापर्यंत गेला असून तो गेल्या चार माहिन्यातील दरापेक्षा कमी आहे. Lockdown Effect : 75 lakh Person’s Lost The Job , Cmie Report
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ अर्थात ‘सीएमआयई’ने सोमवारी उद्योग आणि सेवा क्षेत्रातील रोजगारासंबंधी आढावा घेतला. त्यात नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात 75 लाख रोजगार बुडाले आहेत. बेरोजगारीचा दर 7.97 टक्के एवढा आहे.
सीएमआयई’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी रोजगाराची स्थिती भयानक असेल, अशी भीती व्यक्त केले मार्चमध्ये शहरात बेरोजगारीचा दर 9.78 तर ग्रामीण भागात 7.13 टक्के राहिला आहे.
यंदाच्या मार्चमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 6.50 टक्के होता. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. त्यानंतर काही भागातील लॉकडाऊनमुळे आर्थिक, औद्योगिक हालचाली मंदावल्याचा विपरीत परिणाम रोजगारावर झाला.
कोरोना साथीवरील नियंत्रणाबाबत तूर्त भाष्य करणे अवघड आहे. मात्र येत्या काही काळात अंशत: लॉककडाऊनमुळे बेरोजगारीवर त्याचा दबाव राहणार असल्याचे आणि निर्बंधांमुळे मनुष्यबळात कपात होण्याची धास्तीही व्यास यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App