वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या कार्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे राम मंदिर परिसरातील जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याची अफवा पेरण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व व्यवहार हा ऑनलाइन झाला आहे. त्यामुळे या व्यवहार हा पारदर्शक आहे. Land purchase transactions in Rammandir area are transparent as they are online
राम जन्मभूमी ट्रस्ट आणि जमीन विक्रेता यांनी केलेले व्यवहार ऑनलाइन असल्यामुळे कोणालाही पाहता येण्यासारखे आहेत. ट्रस्टवर राजकीय हेतूने आरोप केले आहेत. श्री राम जन्मभूमी ट्रस्ट आणि सुल्तान अन्सारी यांच्यात सुमारे साडे तीन एकर जमिनीचा व्यवहार झाला होता. ही जमीन ट्रस्टला मंदिर परिसरात विकास करण्यासाठी हवी होती. ती अन्सारी यांनी मंदिर कार्याला मदत करण्यासाठी म्हणून दिली.
ट्रस्ट आणि अन्सारी यांच्यात दहा वर्षांपूर्वी जमीन देण्याचा करार झाला होता. ट्रस्टने जमीनखरेदीचा व्यवहार ऑनलाइन केला. १४२३ रुपये चौरस फूट या प्रमाणे अन्सारी यांनी ट्रस्टला जमीन विकली आहे. ही जमीन त्यांनी दहा वर्षांपूर्वी २ कोटींना खरेदी केली होती. ती ट्रस्टला १८ कोटी रुपयांना विकली आहे. विशेष म्हणजे मंदिर परिसरात सध्या जागेचा दर हा २ हजार रुपये चौरस फूट आहे. त्या पेक्षा कमी किमतीत हा व्यवहार झाला आणि तो ऑनलाइन झाला आहे. मग, सर्व काही उघड असताना ट्रस्टवर गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. दहा वर्षांपूर्वी जमिनीचे दर कमी होते. जमीन खरेदीचा व्यवहार झाला तेव्हा दर जास्त होते. विशेष म्हणजे राम मंदिराच्या बाजूने निकाल लागल्यावर अयोध्येतील जमिनीच्या किंमती वाढल्या.
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री तेजनारायण पांडेय पवन यांनी राम मंदिराच्या परिसरातील बाग बिजेशी येथील जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून रविवारी खळबळ उडवून दिली होती. त्यांचे सर्व आरोप ट्रस्टने खोडून काढले आहेत. ट्रस्टने सांगितले की, जमिनीबाबत अगोदरच करार झाला होता आणि बाजारभावापेक्षा कमी दराने जमीन खरेदी केली होती.
२ कोटींची जमीन ट्रस्टने केवळ १० मिनिटात १८.५० कोटींना सुल्तान अन्सारी यांच्याकडून खरेदी केली, असा आरोप तेजनारायण पांडेय पवन यांनी केला होता. मात्र ट्रस्टने तो खोडून काढला आहे. या जमिनीच्या आसपासचा दर हा २ हजार रुपये प्रति चौरस फूट असताना ट्रस्टने ही जमीन १४२३ रुपये या प्रमाणे खरेदी केली. जी बाजारभावापेक्षा कमी दरात असल्याचे स्पष्ट होते. १२ हजार ८० चौरस मीटर क्षेत्र ट्रस्टने सुल्तान यांच्याकडून खरेदी केले. दुसरीकडे पांडेय यांच्या आरोपात तथ्य नाही. कारण तो व्यवहार ऑनलाइन असल्याने सर्वाना पाहता येण्यासारखा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App