अश्लील छायाचित्राच्या साह्याने तरुण संगीतकाराकडून उकळली लाखोंची खंडणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई – फेसबुकवर झालेल्या मैत्रिणीने व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील छायाचित्र घेऊन उद्योन्मुख संगीतकाराकडून सव्वा लाखांची खंडणी उकळली आहे. वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून अखेर त्या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली आहे. lakh ransom from young musicians with the help of pornography

तक्रारदार हा २१ वर्षाचा आहे. फेसबुकवर त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर मोबाईल क्रमांकांचीही देवाणघेवाण झाली. २७ मे ते २८ मेच्या दरम्यान त्याला या तरुणीला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल आला होता.

त्यावेळी त्याला तरुणीने अश्लील गोष्टी करण्यास सांगितल्या. त्यानेही त्या केल्यानंतर तरुणीने त्याच्या व्हिडीओचे छायाचित्र घेतले. त्याच्या साह्याने तक्रारदार तरुणाला वारंवार धमकवण्यास व पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यावर एक लाख १५ हजार रुपये त्याने आरोपीला पाठवले.

पण त्यानंतरही आरोपीची मागणी वाढल्यामुळे अखेर तक्रारदाराने याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

lakh ransom from young musicians with the help of pornography

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात