Kashmir targeted killings : हे आहे वास्तव!!; हालात सुधरे, आतंकी बिगडे!!


काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंच्या टार्गेटेड हत्या सुरू असताना देशभरात एक विशिष्ट नॅरेटिव्ह सेट केला जातो आहे. 1990 मध्ये काश्मीरमधून पलायन कराव्या लागलेल्या हिंदूंशी 2022 मधील हिंदू पलायनाची हेतूतः तुलना केली जात आहे. काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंची टार्गेटेड हत्या केली जात आहे हे वास्तव आहे. पण त्यानंतर 1990 सारखे हिंदूंचे पलायन होते आहे का?? हे वास्तव आहे का?? याचा तटस्थ आढावा घेतल्यानंतर ते तसे नाही हे लक्षात येते.Kashmir targeted killings: This is the reality !!; Things get better, terror worsens

त्यावेळी मशिदींमधून जाहीर आव्हाने

1990 च्या दशकात मशिदींमधून जाहीर धार्मिक द्वेष फैलावणार्‍या घोषणा देऊन हिंदूंना पलायन करणे भाग पाडले होते. पण त्यावेळी सरकार ॲक्शन मोडमध्ये अजिबात नव्हते. किंबहुना 1990च्या दशकातले हिंदू हत्याकांड आणि हिंदू पलायन हे दोन्ही सरकारी पातळीवर पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न झाला. त्याची आकडेवारी म वास्तववादी पद्धतीने बाहेर येऊ दिली नव्हती. दहशतवाद्यांना आणि फुटीरतावाद्यांना त्यावेळच्या सरकारचा प्रतिसाद अतिशय गुळमुळीत आणि उथळ होता, हे सरकारी कागदपत्रांमधूनच स्पष्ट होते.



झिरो टॉलरन्स पॉलिसी

मात्र 2022 मध्ये ती वस्तुस्थिती नाही. ही फुटीरतावाद्यांना आणि दहशतवाद्यांना सरकारचा मिळणारा प्रतिसाद झिरो टॉलरन्स पॉलिसीवर आधारित आहे. यासिन मलिकला झालेली शिक्षा हा त्याचा पुरावा आहे. त्याच्याबरोबर बिट्टा कराटे सारख्या अन्य 12 जणांवर फुटीरतावाद्यांच्या विरोधात खटले वेगाने सुरू आहेत. त्यांच्या देखील शिक्षा लवकर निश्चित होणार आहेत.

 विकास योजनांना वेग

सरकारी पातळीवर विकासात्मक योजना गुंतवणूक यांनी वेग घेतला आहे. नेमके हेच फुटीरतावाद्यांना खटकत आहे आणि त्यातून विकास कामांवर असलेल्या हिंदु कर्मचाऱ्यांच्या टार्गेटेड हत्या केल्या जात आहेत.

 दहशतवाद्यांचे अस्तित्वाचे इरादे

1990 च्या दशकात फुटीरतावाद यांचा आणि दहशतवाद्यांचा इरादा काश्मीर वर संपूर्ण कब्जा करण्याचा होता. प्रयत्न त्या दिशेने वेगाने घडत होते. 2022 मध्ये फुटीरतावाद्यांच्या आणि दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या आश्रयदात्यांच्या थेट अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काश्मीरमध्ये एकीकडे सकारात्मक विकास आणि दुसरीकडे सरकारची झिरो टॉलरन्स पॉलिसी यामुळे फुटीरतावाद्यांचे जर कंबरडे मोडणार असेल तर आपल्याला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यावाचून पर्याय नाही हे फुटीरतावाद यांच्या लक्षात आले आहे आणि त्यातूनच टार्गेटेड हत्या सुरू आहेत.

टार्गेटेड हत्यांना परिणामकारक उत्तर

पण दहशतवाद्यांच्या या कृत्यांना देखील तितकेच परिणामकारक उत्तर देण्याची योजना बनली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये ताबडतोब काश्मीर खोर्‍यात निमलष्करी दलाच्या 400 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमित शहांबरोबर वरिष्ठांची बैठक

अमित शहा यांच्या बरोबरच या बैठकीत
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, जम्मू कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह, निमलष्करी दलाचे प्रमुख गुप्तचर पोलीस आणि नागरी प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 हिंदू कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था कडक

हिंदूंच्या टार्गेटेड हत्यांचा आढावा या बैठकीत घेतला. हिंदू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग दिले जाईल. परंतु, सरसकट सर्वांना जम्मू विभागात पोस्टिंग दिले जाणार नाही, हे या बैठकीत ठरविले. तसे केले तर फुटीरतावादी यांच्या मनसुब्यांना बळी पडल्याची भावना निर्माण होईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी बैठकीत दिला आहे. मात्र त्याचबरोबर हिंदू कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णयही घेतला आहे.

5 महिन्यांत 10 लाख पर्यटक

– काश्मीर मधील वास्तविक स्थितीचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. यात 370 कलम हटवल्यानंतर काश्मीर मध्ये पर्यटन वाढले आहे. जानेवारी ते मे 2022 दोन या 5 महिन्यांत तब्बल 10 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आहे.

अमरनाथ यात्रेसाठी मोठा प्रतिसाद

अमरनाथ यात्रेसाठी 1 जून पर्यंत 2.50 लाख भाविकांनी यात्रेचे रजिस्ट्रेशन केले आहे. अमरनाथ यात्रेमध्ये 8 लाख भाविक सहभागी होण्याचे नियोजन केले आहे. काश्मीर मध्ये 30 वर्षानंतर काश्मीर फिल्म फेस्टिवल आयोजित केला आहे 15 ते 20 जून असा 5 दिवस हा फेस्टिव्हल चालेल. या सर्व बाबींशी संबंधित सुरक्षा व्यवस्थेचा अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेतला आहे.

जम्मू काश्मीर लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिम समुदायाची लोकसंख्या 68.31 % आहे, हिंदुची लोकसंख्या 28.44 %. शीख समुदायाची लोकसंख्या 1.87 % आहे.

एका रिपोर्टनुसार जम्मूमध्ये कश्मीरी पंडितांचे 43618 परिवार राहतात. दिल्ली-एनसीआर मध्ये 19338 परिवार कश्मीरमधून आले आहेत.

Kashmir targeted killings: This is the reality !!; Things get better, terror worsens

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात