मनसे घराघरात पोहोचणारा पक्ष नाही; तरीही राज ठाकरेंचे पत्र वाटणाऱ्या मनसैनिकांना अटक!!


प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे हा काही महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचणारा पक्ष नाही, असे उद्गार काढले, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पत्र घराघरांमध्ये पोहोचवणाऱ्या मनसैनिकांना अटक केली आहे.  arresting Mansainiks who thought it was Raj Thackeray’s letter

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विषयावर पत्रक काढले आहे. हे पत्रक मनसैनिक घरोघरी जाऊन वितरित करत आहेत. भोंग्यांचा विषय कायमचा संपवावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी या पत्रकातून केले आहे. पण आता हे पत्रक वाटणाऱ्याही मनसैनिकांची पोलीस धरपकड करू लागले आहेत. त्यामुळे आधीच मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावताना पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले होते, आता भोंग्यांच्या विरोधात काढलेले पत्रक वाटताना पोलीस मनसैनिकांची धरपकड करत आहेत.

– राज ठाकरेंच्या पत्रकालाही विरोध 

राज ठाकरे यांचे हे पत्रक त्यांच्या हस्ताक्षरातील आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत हे पत्रक छापले आहे. हे पत्रक मनसैनिक घराघरात पोहचवत आहेत. व्यापक लोकसहभागाशिवाय आपले हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी ते पत्रक घराघरात वाटण्याची तयारी केली. मात्र हे पत्रक वाटणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. घाटकोपरच्या असल्फा विभागात मनसे उपाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी प्रथम या पत्राचे महेश्वर मंदिरात पूजन केले. त्यानंतर हे पत्र घरोघरी वाटप करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चेंबूर येथेही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरसीएफ पोलीस स्थानकात मनसे कार्यकर्त्यांना बसवून ठेवण्यात आले. विना परवाना पत्रक वाटत असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली.

दादर विभागात मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माहीम येथील मकरंद सोसायटीमधील रहिवाश्यांना या पत्रांचे वाटप करत मनसेची भूमिका सांगितली. तसेच पोलिसांनी कितीही जणांना अटक केली तरी मनसैनिक पोस्टमन बनून राज ठाकरे यांचे हे पत्र घराघरात पोहोचवतीलच, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

 arresting Mansainiks who thought it was Raj Thackeray’s letter

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात