ओबीसी आरक्षण : गोपीनाथ गडावरून शिवराज मामांचे ठाकरे – पवार सरकारवर शरसंधान; पंकजांची स्तुती!!


प्रतिनिधी

बीड : भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारवर जोरदार शरसंधान साधले आणि त्याच वेळी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची स्तुती केली. गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान बोलत होते. Shivraj Mama’s Thackeray from Gopinath fort – Sharasandhan on Pawar government

पंकजा मुंडे या मध्यप्रदेश भाजपच्या प्रभारी आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवराज सिंह चौहान यांना गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला गोपीनाथ गडावर बोलवले होते. मध्यप्रदेशात ज्यांनी ओबीसी आरक्षण यशस्वी करून दाखवले या बद्दल पंकजा मुंडे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

– मराठी माध्यमांचे वेगळे वळण

मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या निमंत्रणाच्या मुद्द्यावरून मराठी प्रसार माध्यमांनी विविध प्रकारच्या बातम्या दिल्या. पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील भाजपच्या बाकीच्या नेत्यांना बोलावले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण दिले नाही वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. परंतु, या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रण द्यावे लागत नाही, असे सांगून वेगळे वळण दिले.

– ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात का नाही?

या कार्यक्रमांमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधले. मनात इच्छा असेल आणि इच्छेमागे शक्ती असेल तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा मार्गी लावता येऊ शकतो हे मध्यप्रदेशात दाखवून दिले आहे, असे शिवराज सिंह म्हणाले. पंकजा मुंडे यांनी देखील याच मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारला खरीखोटी सुनावली. शिवराज मामा मध्य प्रदेशात जे करू शकतात, ते महाराष्ट्राचे सरकार राज्यात का करू शकत नाही?, असा परखड सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

– शिवराज मामांचे महाराष्ट्राशी नाते

एकीकडे ठाकरे – पवार सरकारवर शरसंधान साधताना शिवराज मामांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाची देखील स्तुती केली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी माझे बंधुत्वाचे नाते होते मी मध्य प्रदेशचा मामा आहे, तसा पंकजाचाही मामा आहे. महाराष्ट्राचा जावई आहे. पंकजा मुंडे मध्य प्रदेश भाजपच्या प्रभारी आहेत. त्या मध्य प्रदेशात भाजपचे संघटन मजबूत करत आहेत. मध्य प्रदेश सरकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्याचे चांगले रिझल्ट राज्यातल्या जनतेला मिळत आहेत, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले.

– पराभवातून खूप शिकले

पंकजा मुंडे यांनी यावेळी विधान परिषदेच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर वेगळे भाष्य केले. मी कोणत्या पदासाठी रांग लावून उभी नाही. पराभवातून मी भरपूर शिकले आहे. हाच पराभव मला दिल्लीला घेऊन गेला आहे. संकटे एवढी मोठी नाहीत की मी त्यांना शरण जावे. गोपीनाथ मुंडे यांची शिकवण संघर्षाची आहे आणि तो संघर्ष मी करते आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Shivraj Mama’s Thackeray from Gopinath fort – Sharasandhan on Pawar government

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था