तोतया पत्रकाराचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले. या प्रकरणी आरोपी तोतया पत्रकारास लष्कर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अकबर पीरसाहब शेख (वय ३७, रा. पानसरेनगर, कोंढवा,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे journalist in Dhingana police station


विशेष प्रतिनिधी

पुणे : तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले. या प्रकरणी आरोपी तोतया पत्रकारास लष्कर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अकबर पीरसाहब शेख (वय ३७, रा. पानसरेनगर, कोंढवा,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Fake journalist razzel in lashkar police station, police registered the crime against accused and arrested him

याबाबत पोलीस कर्मचारी संतोष बनसुडे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेखने वादातून बालगोपी बलगाणी (वय ३२, रा. सोलापूर रस्ता) याला मारहाण केली. त्यानंतर बलगाणी पुलगेट पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आला. तेव्हा पाठोपाठ शेख तेथे आला. पोलीस चौकीतील कर्मचारी बनसुडे यांना त्याने धमकावण्यास सुरुवात केली. ‘मी मदत फाऊंडेशनचा अध्यक्ष असून पत्रकार आहे,’ असे आरोपी शेखने पोलीस कर्मचारी बनसुडे यांना सांगितले.

’माझ्यावर कारवाई केलीत, तर मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करीन. माझ्या विरोधात तक्रार घेतल्यास मी दाखवतो कोण आहे ते’,तू माझ्या विरोधात तक्रार करू शकत नाही मी तुझ्या विरोधात तक्रार करून तुझी जिरवतो अशी धमकी देऊन आरोपी शेखने पोलीस चौकीत गोंधळ घातला.

त्यानंतर त्यास लष्कर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले असता, त्या ठिकाणी ही त्याने आरडाओरड करून वरिष्ठांना अरेरावीची भाषा करत , माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्यास मी काय आहे हे लष्कर पोलिसांना दाखवून देतो असे सांगत धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शेखला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.

journalist in Dhingana police station

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात