प्रतिनिधी
मुंबई : मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी आज दुपारी संयमी भूमिका घेत उद्याची ईद होऊ द्या. मुस्लिमांच्या सणांमध्ये आपल्याला कोणती बाधा आणायची नाही. त्यामुळे उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी महाआरत्या करू नका. नंतर नंतर काय करायचे ते मी सांगेन, असे आवाहन करणारे ट्विट केले आहे. राज ठाकरे यांनी आज दुपारी अचानक भूमिका बदलल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. Let Eid be tomorrow, not Maha Aarti; Raj Thackeray’s sudden restrained message in the afternoon
गुढीपाडव्या पासून ते संभाजीनगर पर्यंत 3 भाषणांमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरे यांनी महाआरत्या रद्द करण्याची अचानक भूमिका का घेतली आहे?, त्यामागे नेमके काय कारण आहे?, असा सवाल या निमित्ताने राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg — Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार आता केसेस घालण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी माघार घेतली का?, असा सवाल काही जण सोशल मीडियावरच्या आपल्या अकाउंटवरून विचारताना दिसत आहेत.
संभाजीनगरच्या अभूतपूर्व सभेनंतर मनसैनिकांनी उद्याच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरत्यांची जोरदार तयारी चालवली होती. मात्र आता राज ठाकरे यांनी महाआरत्या करू नका असा निर्णय दिल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थात मनसे कार्यकर्त्यांनी आमच्या उघडपणे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली दिसत नाही. परंतु भोंग्यांना जोशींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने मनसैनिकांमध्ये जे चैतन्य पसरले होते त्या चैतन्याला राज ठाकरे यांच्या आजच्या दुपारच्या भूमिकेमुळे अचानक अवरोध निर्माण झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more