प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातिवादी राजकारणाचा आरोप केला. बाबासाहेब पुरंदरे यांना ते ब्राह्मण असल्यामुळे सॉफ्ट टार्गेट करून पवारांनी त्यांना उतारवयात देखील त्रास दिला, असा आरोप राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत केला. Reversal of interests; Dr. serving Pawar. Do you want to tell the caste of Ravi Bapat?
या आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे म्हणतात, पवारांनी ब्राह्मणद्वेष केला. पण पवारांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यांचे ऑपरेशन करावे लागले. त्या वेळी त्यांच्या जवळ बसून अक्षरश: कंपाउंडर सारखी त्यांची सेवा करणारे डॉ. रवी बापट होते. मग त्यांची आम्ही जात सांगायची का??, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
एक प्रकारे आव्हाड यांनी रवी बापट यांचा कंपाउंड असा उल्लेख करून राज ठाकरे यांच्या बरोबर डॉ. बापट यांनाही टोचले आहे आणि त्यांची जात सांगायची का??, असे म्हणतानाच ते ब्राह्मण असल्याचे सांगून टाकले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more