विशेष प्रतिनिधी
जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही बाजूंनी आज सलग दहाव्या दिवशी अग्निवर्षाव सुरु होता. संघर्षात अनेक नागरिकांचा मृत्यू होत असतानाही, शस्त्रसंधीचा कोणताही विचार नाही, असे इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. पॅलेस्टाइनमधील हमास या संघटनेने मात्र, शस्त्रसंधीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. Istryal Palestine conflict not stopped yet
इस्राईलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये हमासचे दोन म्होरके मारले गेले, तर इतर सहा नागरिकांचाही मृत्यू झाला. हे सहा जण एकाच कुटुंबातील होते. रात्रभर हे हल्ले सुरु होते. गाझा पट्टीतूनही रॉकेटचा मारा सुरु होता. या माऱ्यात इस्राईलच्या हवाई तळांचे नुकसान झाल्याचा दावा हमासने केला आहे.
Israel Vs Palestine : युद्धात आतापर्यंत ५९ बळी, शत्रूला नामोहरम करेपर्यंत हल्ले सुरूच ठेवण्याची इस्रायलची भूमिका
या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंमध्ये शस्त्रसंधी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना लवकरच यश येईल, अशी आशा हमासने व्यक्त केली आहे. मात्र, आमचे हल्ले पूर्ण क्षमतेने सुरुच राहणार असून शस्त्रसंधी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असे इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App