भारत-रशिया मैत्री “पहिली उरली” नाही!!; मणिशंकर अय्यर यांचे दुखणे “आंतरराष्ट्रीय” आहे, साधे नाही!!


मणिशंकर अय्यर यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका करताना चीन आणि पाकिस्तानची भीती दाखवून मोदी सरकारने भारताला भित्रा ससा बनवून ठेवले आहे, अशी टीका केली आहे.Indo-Russian friendship is not “first left”

पण यातला सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ भारताची रशियाशी असलेली दीर्घ काळची मैत्री पातळ झाल्याचा किंवा कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा मूळ आरोप करताना त्यांनी बाकीच्या गोष्टींना मीठ -मसाला लावून सांगितले आहे. भारत अमेरिकेच्या कच्छपी लागला आहे हा कम्युनिस्टांचा जुना लाडका सिद्धांत आहे. तोच त्यांनी आळवला आहे. पण त्यांचे जे मूळ दुखणे हे की भारत आणि रशिया यांचे इंदिरा गांधी यांच्या काळात प्रस्थापित झालेले संबंध मोदी सरकारच्या कारकिर्दीत
पातळ झाले आहेत आणि भारत आता रशियाच्या पंखाखाली राहिलेला नाही हे आहे…!!

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारताने परराष्ट्र आणि संरक्षण या दोन्ही धोरणांमध्ये इंदिरा गांधींच्या किंवा त्यानंतरच्या काँग्रेस राजवटीच्या कोणत्याच मुद्द्यांना महत्व ठेवलेले नाही, हे ते खरे दुखणे आहे…!!

भारतावर राज्य करायचे आणि आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावत राहायची हे नेहरू-गांधी परिवाराची वर्षानुवर्षांचे धोरण राहिले आहे. त्याला आता कुठेतरी अटकाव झाल्याचे मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. भारतातल्या रशियातल्या कित्येक मुलींची नावे इंदिरा ठेवत असत अशी आठवण मणिशंकर अय्यर यांनी सांगितले आहे. ही आठवण खरी आहे. पण त्या काळात भारत आणि रशिया यांची मैत्री कोणत्या आधारावर झाली होती? तिचे परिणाम काय झाले होते? याचे तपशील मात्र चलाखीने मणिशंकर अय्यर यांनी सांगितलेले
नाहीत. कारण ते आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी आहेत.


रशिया आणि युक्रेनमध्ये वाढता तणाव!


रशिया एके काळी भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश होता. भारताच्या सर्व संरक्षण गरजा तयार करण्याची आणि त्या पूर्ण करण्याची जणू जबाबदारीच रशियाने घेतली होती किंबहुना भारताच्या त्या काळातल्या सरकारांनी स्वतःहुन ती जबाबदारी रशियाला दिली होती. याला भारत-रशिया मैत्रीचे किंबहुना भारत सोवियत युनियन मैत्रीची झूल चढवली गेली होती. आता ती झूल उतरली आहे. गंगा, यमुना आणि व्होगा या नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्या संबंधांमध्ये फेरबदल झाले असल्यास ते संपूर्णपणे अयोग्य ठरवता येणार नाहीत.

मणिशंकर अय्यर यांचे दुखणे त्या पलिकडचे देखील “आंतरराष्ट्रीय दर्जाचे” आहे आणि ते दुखणे केंद्रातल्या मोदी सरकारच्या एकध्रुवीय राजकारणापासून बाजूला होण्यातून तयार झाले आहे. कोणत्याही एका देशावर आपले परराष्ट्र धोरण अथवा संरक्षण धोरण अवलंबून ठेवायचे नाही हा या सरकारच्या मूलभूत धोरणाचा गाभा आहे. त्याच वेळी आपल्या सर्व संरक्षण विषयक गरजा आपण तयार करायच्या आणि आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे हा धोरणात्मक निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे रशियावरचे आपले अवलंबित्व कमी झाले आहे. आत्मनिर्भर भारत ही नुसती घोषणा उरलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर देशातल्या 41 ऑर्डनन्स फॅक्टरी नसे सात कंपन्यांमध्ये रूपांतर करून त्या कंपन्यांना संरक्षण सामग्री उत्पादनाची आणि निर्यातीची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारची या कंपन्यांना पहिली ऑर्डर तब्बल 65000 कोटी रुपयांची आहे. देशात अंतर्गत विविध खासगी कंपन्यांना सरकार संरक्षण उत्पादनाच्या ऑर्डर्स देत आहे. इतकेच नाही तर परवाच केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेऊन सुमारे 2500 कोटी रुपयांचा भारतीय हवाई दल यांच्या विमाने, विमानतळ यांच्या मेंटेनन्स करार भारतीय कंपन्यांशी केला आहे. आत्तापर्यंत हे मेंटेनन्स परकीय कंपन्या करत असत. त्यांच्या अटी शर्तींवर आपले हवाई दल मेंटेनन्स स्वीकारत असे. हे आता बंद झाले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या आधी संरक्षण मंत्रालयाने रशियाशी एके 230 रायफल यांच्या आयातीचा करार फायनल केला आहे हा करार 5000 कोटी रुपयांचा आहे याआधी रशियाकडून आपण इतक्या कमी किमतीचा फरार फारसा कधी केलेला नाही किंबहुना भारतीय लष्कराला उपयोगी पडतील अशा रायफल्स डोंगरी प्रदेशात लढाई साठी लागणारी उपकरणे यांची उत्पादने आपण रशिया सह अन्य देशांकडून घेत होतो. परंतु ते आता बंद केले आहे. त्या ऐवजी भारतीय कंपन्यांची उत्पादने वापरण्यास सुरुवात झाली आहे अशा स्थितीत भारताचे रशियाशी असलेले संबंध इंदिरा गांधींच्या काळात होते तसेच राहतील अशी अपेक्षा करणे गैर आहे.

त्याच बरोबर मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसी राजवटीच्या वैशिष्ट्य असेही दुखणे व्यक्त केली आहेस ते म्हणजे या शस्त्रास्त्र खरेदीमध्ये जे व्यवहार होत असत त्यामधून काही विशिष्ट व्यक्तींना त्याचा जो लाभ मिळत असे तो “लाभांश” आता बंद झाला आहे. विविध आंतरराष्ट्रीय करार यांचे निमित्त करून मैत्रीच्या झुली चढवून “अंडर द कार्पेट” ज्या बऱ्याच गोष्टी होत होत्या त्या थांबुन जी विविध दुखणी जडली आहेत ती मणिशंकर अय्यर यांच्या मुखातून बाहेर आली आहेत… एवढेच…!!

Indo-Russian friendship is not “first left”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात