खाद्यतेलाचे भाव लवकरच उतरतील; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही


वृत्तसंस्था

बेंगळुरू – देशात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत, हे मान्य करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे भाव लवकरच कमी होतील, अशी ग्वाही दिली आहे. India’s dependence on edible oil is very high. Edible oil prices went up after an impact on edible oilseed production

देशातील खाद्यतेलाची गरज मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. खाद्यतेलाचे उत्पादन घटल्याचा परिणाम त्याच्या किंमतीवर झाला. त्यामुळे देशात त्याचे भाव वाढले, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. गेल्या वर्षी पामतेलाची आयात कोरना महामारीमुळे घटली होती. आता ती हळूहळू वाढते आहे. येथून पुढे जशी पामतेलाची उपलब्धता वाढेल, तसे त्याचे दरही कमी होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

देशात तेलबियांची लागवड वाढली पाहिजे. यंदाच्या मोसमात जर तेलबिया लागवड क्षेत्र देशभरात वाढले तर त्याचाही चांगला परिणाम खाद्यतेलाच्या उपलब्धतेत होऊ शकेल आणि त्यातून देखील त्याचे दर नियंत्रित राहू शकतील, याची आठवण सीतारामन यांनी करवून दिली.

दीर्घ कालीन भविष्याच्या दृष्टीने देशात तेलबियांचे क्षेत्र वाढविणे हे भारतीय शेतकऱ्यासाठी देखील किफायतशीर ठरेल. शिवाय देशाची खाद्यतेलाची गरज भागवून आपण काही प्रमाणात खाद्यतेलाची निर्यातही करू शकू. देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील देशी तेलबियांपासून तयार केलेली खाद्यतेले लाभदायक ठरू शकतील, असा आशावाद निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.

 

India’s dependence on edible oil is very high. Edible oil prices went up after an impact on edible oilseed production

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात