चंदीगड नगर निगम निवडणूक पंजाबची लिटमस टेस्ट मानली तर कोणाच्या हाताला काय लागेल…??


चंदीगड नगर निगम निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या आम आदमी पार्टीने भाजपला मागे टाकत पहिला नंबर मिळवल्यानंतर जणू काही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने पूर्ण बहुमत मिळवल्याचे ढोल पिटले जात आहेत. पण प्रत्यक्षात तसे घडले आहे का?, हे पाहिले तर आणि पंजाब विधानसभा निवडणुकीआधीची चंडीगड नगर निगम निवडणुकीची ही लिटमस टेस्ट काय सांगते, हे नेमकेपणाने लक्षात येईल.If Chandigarh Municipal Corporation election is considered as litmus test of Punjab, what will happen to anyone

चंडीगड मध्ये भाजप सत्ताधारी पार्टी होती. तिला मागे सारून म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर ढकलून आम आदमी पार्टीने पहिला नंबर मिळवला आहे. पण याचा अर्थ त्या पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले असा नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नावाने स्वतः अरविंद केजरीवाल, राघव चढ्ढा किंवा अन्य कोणीही कितीही ढोल पिटले तरी पंजाबची राजकीय वस्तूस्थिती त्यामुळे बदलत नाही.



वस्तुस्थिती अशी आहे, की चंडीगड नगर निगममध्ये त्रिशंकू निकाल लागले आहेत. आणि असेच निकाल अरविंद केजरीवाल यांना जर पंजाब विधानसभा निवडणुकीत अपेक्षित असतील तर याचा अर्थ पंजाब मध्ये आपल्या आम आदमी पार्टीला पूर्ण बहुमत मिळणार नाही याची जणू कबुली दिल्याचे मानले जाऊ शकते.

पंजाबमध्ये सध्या काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेवर आहे. चंडीगड नगर निगम निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. याचा अर्थ पंजाबमध्ये काँग्रेसला याच क्रमांकावर विधानसभा निवडणुकीनंतर राहावे लागेल का, असे मोठे ठळक प्रश्नचिन्ह आता पक्षावर लागले आहे…!!

आम आदमी पार्टीचा झालेला फायदा हा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवणारा नक्कीच आहे. पण इथेच नेमकी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने मी मेख मारून ठेवली आहे. पंजाबमध्ये भाजपला स्वतःच्या बळावर काहीही विजय मिळवण्याची आशा आणि अपेक्षा नाही. म्हणून आजच जेव्हा चंदीगड नगर निगमचे निकाल लागत होते,

त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कॅप्टन अमरिंदरसिंग, संयुक्त अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह धिंडसा, भाजपचे पंजाब प्रभारी गजेंद्र सिंग शेखावत यांची महत्वपूर्ण बैठक होत होती. अर्थातच चंडीगड नगर निगम निकालावर या सगळ्यांचे लक्ष होतेच. या निकालातून नेमका कोणता धडा घ्यायचा आणि कोणती चाल आखायची यावर बैठकीत खल झाला आहे.

पंजाब मध्ये आम आदमी पार्टी पुढे सरकणे, याचा अर्थ अकाली दलाला मोठा धक्का बसणे, असाही आहे. काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. म्हणजे एकाच वेळी सत्ताधारी काँग्रेस आणि अकाली दल यांना धक्का देणे जे भाजपला शक्य होत नव्हते ते आता आम आदमी पार्टीने करून दाखवले आहे. एक प्रकारे पंजाबमध्ये “लेव्हल प्लेइंग फील्ङ” तयार करण्याचे काम आम आदमी पार्टीने केले आहे.

त्यामुळे ज्या निवडणुकीत भाजपला कोणतीही आशा आणि अपेक्षा नव्हती किंबहुना कृषी कायद्यासंदर्भात मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर भाजपच्या राजकीय आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या होत्या तेथे भाजपला थोडी राजकीय धुगधुगी मिळण्याची चिन्हे चंडीगड नगर निगम निवडणूक निकालाने दाखविली आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीत अशीच त्रिशंकू अवस्था जर येणार असेल तर भाजपच्या ती नक्कीच पथ्यावर पडणारी असेल. कारण जो पक्ष कधी स्पर्धेतच नव्हता त्या पक्षाला स्वतःची राजकीय भूमी तयार करण्याची संधी पुढच्या पाच वर्षांसाठी मिळणार आहे. काँग्रेस पराभूत होऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाणे यापरता दुसरा आनंद कॅप्टन अमरिंदरसिंग यांना नसेल. सुखबीर सिंग बादल यांच्या अकाली दलाला जर आम आदमी पार्टीकडून असा परस्पर फटका बसत असेल

तर संयुक्त अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह धिंडसा यांच्यासाठी तो राजकीय फायदा असेल. सुखबीर सिंग बादल यांनी मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची युती करून स्वतःच्या पक्षाच्या जागा वाढवण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले आहेत. परंतु, या युतीचा चंडीगड नगर निगममध्ये काही फायदा झालेला दिसत नाही.

त्यामुळे चंडीगड नगर निगम ही निवडणूक जर पंजाबच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली, तर पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कोणाच्या हाती नेमके काय लागेल?, हे या निवडणुकीने स्पष्ट केले आहे. पंजाबमध्ये त्रिशंकू विधानसभा येण्याची शक्यता आहे…!!

If Chandigarh Municipal Corporation election is considered as litmus test of Punjab, what will happen to anyone

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात