विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : सुरळीत वाहतुकीसाठी अमेरिकेत आता वायफायचा प्रभावी आधार


वाहन उद्योगात रोज नवनव्या बाबींची भर पडत असते. अमेरिकेत आता मोटारी देखील एकमेकीशी संपर्क साधू शकतील अशा योजनेवर वेगाने काम सुरु आहे. त्यासाठी मोटारींमध्ये स्मार्ट उपकरण बसविण्यात येणार असून त्यामुळे या स्मार्ट मोटारी स्वतः एकमेंकाशी संपर्कात राहतील त्याच प्रमाणे चालकाला माहिती देतील. या योजनेनुसार बिनतारी उपकरणांद्वारे या स्मार्ट कार एकमेकांकडे संदेश पाठवू शकतील. त्यामुळे या गाड्यांच्या चालकांना थांबलेली वाहतूक किंवा लाल दिवा असतानाही त्याचे उल्लंघन करून पुढे आलेल्या गाड्या अशा संभाव्य धोक्यांची देवू शकतील. त्याच प्रकारे जर रस्ता मोकळा असेल तर वाहतुकीच्या सिग्नलचा रंग हिरवा करून पुढे जाता येणार आहे. WiFi is now an effective base for smooth transportation in the United States

यातून रस्ते अपघात कमी करता येतील असे तेथील वाहतूक विभागाला वाटते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे उपकरण प्रत्येक गाडीत बसवता येईल. सध्या हे उपकरण लावलेल्या दीड हजार गाड्या रस्त्यावर धावत आहेत. तेथे लोकांच्या आयुष्याला कमालीचे महत्व दिले जाते. म्हणजे अपघात घडू नये, घडला तर त्यात कोणाचा बळी जावू नये यासाठी कमालीची दक्षता घेण्यात येते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी वाय-फाय सारख्या तंत्रज्ञानावर आधारित अडीच कोटी डॉलर खर्चाची ही योजना अमेरिकेत सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची जगातील ही पहिलीच योजना आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांना परस्परांशी व महामार्गावरील वाहतुकीसाठी असलेल्या पायाभूत सुविधांशी संपर्क साधता येणार आहे. मिशिगनमध्ये सध्या याच्या चाचण्या सुरू आहेत.

वाहन निर्मात्यांनी एअर बॅग्ज, अँटिलॉक ब्रेक्स आणि स्टेबिलिटी कंट्रोल यांसारख्या सुरक्षा उपकरणांचा वापर सुरू केल्याने अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. त्याच प्रकारे जर गाड्यांचा संपर्क एकमेकांशी झाला तर ऐंशी टक्के अपघात कमी होतील असा होरा आहे. पुढे जावून जगातही या मोटारी धावलय्सा जगभरात अपघातांचे प्रमाणही कमी होतील.

WiFi is now an effective base for smooth transportation in the United States

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात