प्रत्येकाचे आयुष्य सध्या तीन पडद्यात सामावले आहे असे म्हटले जाते. हे तीन पडदे म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि संगणक. या तिन्ही पडद्यांवर चकचकीत, आकर्षक, अलिशान, डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगांचे, व्यक्तींचे साम्राज्य असते. जगण्यात धाडस हवे. वेगळेपण हवे. नाविन्य हवे असे हे पडदे सांगतात. सतत नवीन काही तरी खरेदी करायला हे पडदे सुचवत असतात. माध्यमांची प्रसिद्धी दिखाऊ नटव्या गोष्टींना दिली जाणारी त्यातून भव्य, प्रशस्त, दैदीप्यमान अशा उत्सवी वातावरणाची मुहूर्तमेढ यातून उभारली जात असते. Under no circumstances should you waste money
तरुणाईची भाषा, तरुणाईची शैली असे शब्दप्रयोग यावर सतत वापरून त्यांना खरेदीली उद्युक्त केले जात असते. या आभासी जगात आपण जे जग पाहतोय तेथे भरमसाठ वस्तू खरेदी करणारा समूह आहे. आपल्या शरीराचा आकार कमी-जास्त करणारे प्रगत तंत्रज्ञान या तीनही पडद्यावर पुन्हा पुन्हा दाखवले जात होते. शरीराचा कोणताही भाग सुडौल करता येत असेल तर तो का करू नये?. चेहऱ्याची ठेवण बदलता येत असेल, अधिक सुंदर रूपवान बनायचे असेल, तरुण दिसायचे असेल तर थोडे पैसे खर्च करायला काय हरकत आहे? जीवनशैलीचा हाच अर्थ अनेकांनी मानला. कारण आसपास चर्चा चालत होती, ती हीच. माझ्याजवळ हवी ती वस्तू हव्या त्या वेळेस मिळवता येते. मला कर्ज मिळू शकते. कर्जावरचे व्याज त्याचा दर याची काळजी करण्याचे कारण नाही. कर्ज घेणे हे वाईट नसते हे बिंबवले गेले. पूर्वी ओळखीला कर्तृत्वाशी जोडले जायचे. आता ओळख लाईकवरून ठरु लागली. छान दिसायचे, त्याकरिता मेकओव्हर करायला लागला तरी बेहत्तर.
बहुतांश टिप्पणी, नोंद ही केवळ छायाचित्रांवर टाकलेली, म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढून घेण्यात आनंद मिळू लागला. कालचा घातलेला कपडा आज घालायचा नाही. पार्टीसाठी निमित्त नको. काटकसर करणारा वर्ग चेष्टेचा विषय ठरावा अशा जाहिरातींचा मारा रोज होत असल्याने जगण्याच्या पद्धतीत बदल करणे अनिवार्य वाटू लागले. मॉल हवा. तेथे जाणे ही अपरिहार्य, अटळ राहणीमानाची गरज मानली गेली, त्यातून गरजेपेक्षा अधिक वस्तू घरात येत गेल्या. त्याचा बदललेल्या जीवनशैलीशी संबंध जोडून आपण मोकळे झालो. सध्याच्या कोरोना नंतरच्या काळात कधीतरी शांतपणे बसून खरेच अमाप खरेदीची, नव्या जीवनशैलीची गरज आहे का हे पुन्हा तपासून पहा. नको तेथे उधळपट्टी करण्याचे टाळा. शेवटी वस्तूंमधून फार कोणाला सुख मिळत नसते हे ध्यानात ठेवा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App