सावधान! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर वाढू शकतो कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला इशारा


जशी केरळमध्ये ज्या प्रकारे ओणमनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ नोंदवली गेली, तश्याच प्रकार महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.  Heads up! After Ganeshotsan in Maharashtra, the outbreak of Corona, Health officials gave a warning


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय.हा गणेशोत्सव दहा दिवस साजरा केला जाईल. परंतु गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जशी केरळमध्ये ज्या प्रकारे ओणमनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ नोंदवली गेली, तश्याच प्रकार महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लोक गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यामुळे ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. सण आणि कोरोना देशातील अनेक राज्यात सार्वजनिक उत्सवांनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं यापूर्वीही दिसून आलं आहे.



बहुतांश नागरिका सध्या मास्क वापरत नसल्याचं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवत नसल्याचेच चित्र समोर दिसत असून त्यामुळे कोरोना वेगाने फैलावण्याची भीती राज्याचे सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलं आहे.

 गणेशोत्सवात काळजी घेण्याचं आवाहन 

गणेशोत्सवाच्या काळात जर कोरोना संकेतांचं काटेकोरपणे पालन केलं, तर मात्र कोरोनाची तिसऱ्या लाटेला महाराष्ट्रात येण्यापासून रोखले जाऊ शकते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

गणेश मंडळांनी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशनची काळजी घेणं, मास्कशिवाय प्रवेश न देणं ही खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाची केंद्रं वाढवणं आणि त्याचबरोबर टेस्ट आणि औषध पुरवठा यांची सोय करणं गरजेचं असल्याचा सल्लाही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे

राज्यात कोरोनाची वाढत असलेली आकडेवारी

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कोरोनाचा पॉजिटिव्हिटी दर हा 2.67 टक्के नोंदवला गेला आहे. शनिवारी राज्यात 3075 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 64,94,254 एवढी झाली आहे.

Heads up! After Ganeshotsan in Maharashtra, the outbreak of Corona, Health officials gave a warning

महत्त्वाच्या बातम्या.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात