अमेरिकन पॉपस्टार निक जोन्सच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा, सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल


वृत्तसंस्था

सोलापूर : सोलापुरी चादरीपासून एखादा सुंदर शर्ट बनवला जाऊ शकतो, अशी कल्पना कोणाच्या मनात येणार नाही. पण, प्रियंका चोप्राचा पती निकने असा शर्ट घालून सर्वानाच धक्का दिला आहे. सोशल मीडियावर निकच्या या नव्या लुकची चर्चा रंगली आहे. Priyanka Chopra Husband Nick Jonas shines in a fashionable shirt of solapuri-chaddar

प्रियंका चोप्राचे लूक नेहमी चर्चेत असतात. पण प्रियंकांचा नवरा निकने सोलापुरी चादरीपासून बनवलेल्या शर्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडे सेंट लुईसमधील एका कार्यक्रमात तो सोलापुरी चादरीचा शर्ट घालून आला. त्याच्या या शर्टची चर्चा रंगली. या शर्टमुळे सोलापुरी चादर पुन्हा चर्चेत आली आहे.


देसी गर्ल प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामच्या रिचलिस्टमध्ये, एका पोस्टसाठी घेते तीन कोटी तर विराट कोहली घेतो पाच कोटी


निकच्या शर्टवर ‘चाटला आर’ असा ट्रेडमार्क दिसतो. याचा अर्थ ही चादर सोलापुरातील चाटला टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये तयार झाली आहे. अमेरिकन पॉपस्टार निकने आपल्या कारखान्यात तयार झालेल्या चादरी पासून तयार केलेला शर्ट घातल्याने चाटला टेक्सटाईलचे मालक गोवर्धन चाटला यांचाही ऊर अभिमानानं भरून आला.

निकने सोलापुरी चादरीपासून शिवलेला शर्ट घातल्याचे फोटो आम्ही पाहिले आम्हाला आश्चर्यही वाटलं आणि अभिमानही वाटला. सोलापूरकर म्हणून याचा अभिमान वाटतोय, असंही गोवर्धन चाटला म्हणाले.

Priyanka Chopra Husband Nick Jonas shines in a fashionable shirt of solapuri-chaddar

महत्त्वाच्या बातम्या.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण