वृत्तसंस्था
मुंबई : अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. 13 मे रोजी श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिनाच्या दिवशी याबाबत घोषणा केली असून चित्रपटाचं नाव ‘फ्री – द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर’ असे आहे. Guru Ravi Shankar Biopic
विशेष म्हणजे हा चित्रपट जगातील 150 देशांमध्ये 21 भाषांमध्ये रिलिज केला जाणार आहे.
रविशंकर यांची भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झाले नाही. चित्रपटाबाबत आणखी मोठे निर्णय घेणे बाकी आहे, त्याबाबत लवकरच घोषणा होतील’, असं सूत्रांनी सांगितलं. गुरू रविशंकर यांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस दाखवले जाणार आहेत. अध्यात्मिक गुरू होण्याचा प्रवास यात दाखवला जाणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती महावीर जैन यांची कंपनी ‘सनडायल एंटरटेनमेंट’ आणि ‘लायका ग्रुप’ नं केली आहे. ‘फ्री- द अन्टोल्ड स्टोरी ऑफ गुरूदेव श्री श्री रवि शंकर’ चं दिग्दर्शन मॉन्टू बस्सी करणार आहेत. त्यांनीच लेखन देखील केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App