अनाथांचे नाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार पेन्शन-शिक्षण-राशन !


करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदतीचा हात पुढे केला केला आहे. अनाथ मुलांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. त्याचबरोबर या मुलांची मोफत शिक्षणाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे.


निराधार कुटुंबे व मुलांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सरकार देणार आहे.Rs 5000/Month Pension For Children Who Lost Parents During Pandemic, MP CM Shivraj Singh Takes BIG Decision.


वृत्तसंस्था

भोपाळ : देशात कोरोनाने भयावह संकट ओढावल आहे . त्यात मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे .या कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. या मुलांची मोफत शिक्षणाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे त्यासोबतच मोफत राशन देखील या मुलांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

करोनामुळे अनेक पालकांचा जीव जात असल्याने लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत मध्य प्रदेश सरकारनं पुढाकार घेतला आहे.

‘करोनामुळे आई वडील गमवले असून घरात कमवतं कोणच नसेल अशा कुटुंबांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन दिलं जाईल.त्याचबरोबर मुलांना मोफत शिक्षणही दिलं जाणार आहे. तसेच ज्या कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबांना मोफत रेशन दिलं जाईल. त्याचबरोबर कुटुंबांना सरकारच्या हमीवर कर्जही दिलं जाईल’, असं मध्य प्रदेश सरकारने जाहिर केलं आहे .

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अशीअनेक कुटुंबे आहेत ज्यांची वृद्धापकाळात एकटे पडले आहेत. अशी  कुटुंबे आहेत ज्यात निरपराध मुलांनी आपल्या  पालकांना गमावले आहे. अशा मुलांसमोर आता जगण्याची समस्या निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. ज्यांच्या कुटुंबातील कमावते गेले आहेत , पालकांची छत्र हरवलेली मुले ज्यांच्या घरात पैसे कमवणारं  कोणी नाही, अशा कुटुंबांना दरमहा ५००० पेन्शन दिली जाईल.

मुलांची चिंता करण्याची गरज नाही, ते राज्यातील मुले आहेत, राज्य काळजी घेईल असेही मुख्यमंत्री म्हणाले .

Rs 5000/Month Pension For Children Who Lost Parents During Pandemic, MP CM Shivraj Singh Takes BIG Decision.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात