सोशल मीडियाला लगाम लागणार; केंद्रानं जारी केली नवीन नियमावली

  • सोशल मीडियाचा सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जातात. त्यामुळे आता केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलली आहेत. केंद्रानं सोशल मीडियाची लगाम आता आपल्या हातात घेतली आहे. 

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद घेत सोशल मीडियाबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी हे नियम बंधनकारक असणार आहेत. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत. New social Media and OTT Rules ravishankar prasad and prakash javadekar press conference

सोशल मीडियासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांवलीची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानसंबंधी नव्या नियमांनुसार सरकारला जी सोशल मीडिया पोस्ट आक्षेपार्ह वाटेल ती पोस्ट सरकारनं आदेश दिल्यानंतर 36 तासांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी हटवावी.सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो याबाबत अनेक तक्रारी येत असतात. सोशल मीडिया कंपन्या भारतात आपला व्यवसाय करू शकतात. पण सोशल मीडियाचा गैरवापराबाबत तक्रार देण्यासाठीदेखील फोरम असावं. 

आम्ही लवकरच एक महत्त्वाची सोशल मीडिया इनर्मिडीएरीसाठी युझर्सची संख्या सांगणार. त्यांच्या तक्रारीसाठी फोरम ठेवावं लागेल. त्यांना तक्रार अधिकाऱ्याचं नावही द्यावं लागेल. जो 24 तासांत तक्रार नोंदवेल आणि 15 दिवसांत त्याचं निराकारण करेल.  तक्रार मिळाल्यानंतर 24 तासांत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट  हटवावी लागेल, असं रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार…

१) तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. तो तक्रार २४ तासांत नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचं निवारण करेल

२) जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल

३) भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसरची नियुक्ती करावी लागेल.

४) प्रत्येक महिन्याला तक्रारींचा अहवाल सादर करावा लागेल. महिन्याभरात किती तक्रारी आल्या आणि त्याच्यावर काय कारवाई केली

५) आक्षेपार्ह मजकूर सर्वात आधी कुणी सोशल मीडियावर टाकला ते सांगावं लागेल. जर तो मजकूर भारताबाहेरून आला असेल, तर तो भारतात पहिल्यांदा कुणी टाकला, हे सांगावं लागणार

६) युजर्सचं व्हेरिफिकेशन कोणत्या मार्गाने केलं गेलं, त्याची माहिती द्यावी लागेल

७) जर कुठल्या युजरचा डेटा किंवा ट्वीट किंवा मजकूर हटवला गेला, तर तुम्हाला युजरला सांगावं लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल

New social Media and OTT Rules ravishankar prasad and prakash javadekar press conference

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*