शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी डाव्यांकडूनच धर्माचा वापर, गुरू गोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले


धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी धर्माचा वापर केला आहे. गुरूगोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका शेतकऱ्यानेच हा प्रकार उघड केला आहे. Guru Gobind Singh’s oath and Sikhism provoked the farmers

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या डाव्या पक्षांनीच शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी धर्माचा वापर केला आहे. गुरू गोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका शेतकऱ्यानेच हा प्रकार उघड केला आहे. Guru Gobind Singh’s oath and Sikhism provoked the farmers

संगरूर येथील एक शेतकरी विजेंद्र सिंह यांनी डाव्यांचा डाव उघड केला आहे. ते म्हणाले की, केंद्राने केलेल्या नव्या कृषि कायद्यांच्या विरोधात डाव्या संघटना सातत्याने शेतकऱ्यांना भडकाविण्याचा प्रयत्न करत आहेत.

नवीन कृषि कायदे मंजूर झाल्यावर डाव्या संघटनांनी गावोगावी प्रचार सुरू केला की हे मोदी सरकारचे हे काळे कायदे शेतीला नष्ट करतील. तुमच्या जमिनी उद्योजकांकडून बळकावल्या जातील. शेतकऱ्यांना या कायद्यांबाबत संभ्रमित करण्यात यश मिळत नाही असे दिसल्यावर या संघटनांनी शिख धर्माच्या सन्मानाबाबत बोलायला सुरूवात केली. शिख शेतकऱ्यांना शिख धर्मगुरू गुरू गोविंदसिंह यांची शपथ घातली.

तरीही शेतकरी आंदोलनात उतरत नाहीत असे दिसल्यावर या संघटनांनी आंदोलनाचा संबंध शिख धर्माच्या गौरवाशी जोडला. लोकांना सांगायला सुरूवात केली की गुरू गोविंदसिंह यांनी मोगलांशी लढा दिला होता. तुम्ही मोगलांना घाबरला नाहीत तर मोदी सरकार त्यापुढे काय आहे?

डाव्या संघटनांच्या नेत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली पैसेही गोळा केल्याचा आरोप विजेंद्र सिंह यांनी केला. ते म्हणाले की, प्रति एकर दोनशे रुपये गोळा करण्यात आले. त्यातून आंदोलन उभे करण्यात आले. संगरूर येथील कम्युनिस्ट नेत्याने प्रति एकर दोनशे रुपये याप्रमाणे लाखो रुपये गोळा केले आणि ते घेऊन दिल्लीला आले. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे म्हणून अनेक शेतकऱ्यांना दिल्लीला आणण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनाला धार्मिक तडका देण्यात आला.

Guru Gobind Singh’s oath and Sikhism provoked the farmers

पंजाबमध्ये अनेक शेतकरी कृषि कायद्याविरुध्द सुरू असलेल्या आंदोलनाच्या विरोधात आहेत. मात्र, एखाद्याने विरोध केला तर त्याला जातीचा शत्रू म्हणून डाव्या नेत्यांकडून मोहीम चालविण्यात येते. त्याच्याविरोधात सामाजिक बहिष्काराचा इशारा दिला जातो. त्यामुळे शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाही तर केंद्र सरकारविरुध्द डाव्या संघटनांनी केलेले षडयंत्र आहे, असाही आरोप करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून डाव्या संघटनांकडून तयारी केली जात आहे. पंजाबमधून डावे पक्ष उखडले गेले आहेत. पुन्हा एकदा पाळेमुळे येथे रुजावीत यासाठीच हे आंदोलन त्यांच्याकडून उभारले गेले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात