मराठा आरक्षण रद्द झाल्याने शैक्षणिक नुकसान झाल्याने तरुणाने आत्महत्या केली आहे. आरक्षण रद्द झाल्याने एमएससीला अॅडमिशन मिळणार नसल्याने त्याने आत्महत्या केली. Due to cancellation of Maratha reservation, suicide of a student in Dhule
प्रतिनिधी
धुळे : मराठा आरक्षण रद्द झाल्याने शैक्षणिक नुकसान झाल्याने तरुणाने आत्महत्या केली आहे. आरक्षण रद्द झाल्याने एमएससीला अॅडमिशन मिळणार नसल्याने त्याने आत्महत्या केली. भावेश दिलीप चव्हाण असे या तरुणाचे नाव आहे. तो धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील रहिवासी आहे. या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, आपले शैक्षणिक नुकसान झाले या नैराश्याने त्याने आत्महत्या केली आहे. असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे निंबा मराठे यांनी केली आहे.
ते म्हणाले बीएसला चांगले गुण मिळवल्याने एमएससी करण्याची त्याची इच्छा होती. मराठा आरक्षणामुळे शुल्कात सवलत मिळणार आहे म्हणून त्याने तयारीही केली होती. पण आरक्षण रद्द झाल्याने त्याच्या स्वप्नांवर पाणी पडले. त्याचे आई वडील दोघेही मजुरी करतात. त्यामुळे पुढचे भविष्य अंधारमय वाटल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App