कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा नाही; शरद पवारांची माहिती


वृत्तसंस्था

मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा होईल असे मला वाटत नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. donot think it will come up in the 2-day State Assembly session. If it comes, should be discussed: NCP chief on Farm Laws

कृषिदिनानिमित्त डी. वाय. पाटील विद्यापीठातील कार्यक्रमानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत भाष्य केले. पवार म्हणाले, की विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात तीनही कृषी कायद्यांचा विषय चर्चेला येईल असे मला वाटत नाही.



मी काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी याबाबत बोललो आहे. राज्याने हे कृषी कायदे संमत करण्यापूर्वी त्यातल्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे. विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात हे शक्य दिसत नाही. पण हा विषय चर्चेला आला तर राज्य सरकारच्या बाजूने त्याची चर्चा केली पाहिजे.

गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि कृषी कायद्यांवरून निर्माण झालेली कोंडी फोडावी, अशी मागणीही शरद पवार यांनी केली.

donot think it will come up in the 2-day State Assembly session. If it comes, should be discussed: NCP chief on Farm Laws

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात